Man Crosses Slackline On Marina Towers Video Viral : एस्टोनियाचा स्लॅकलाईन अॅथलीट जान रुज यांनी असा कारनामा केला आहे, जे पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. रुजने त्याच्या भन्नाट कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ४९२ फूट लांब रस्सीवर चालून एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विक्रम रुज यांच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. कतार येथील लुसैल मरीनच्या टॉवर्सच्या दोन्ही बाजूला रस्सी बांधण्यात आली होती. सोसाट्याचा वारा सहन करून रुजने या लांब रस्सीवरून चालत पलीकडचं ठिकाण गाठलं. उंच इमारतींवरील हा थरारक व्हिडीओ रुजने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हवा वेगाने सुरु असतानाही रुज त्याच्या शरीराचा तोल सांभाळत रस्सीवरून चालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आजूबाजूला कोणत्याच प्रकारचा त्याला सपोर्ट मिळत नाही. तरीही खतरनाक स्टंट करून त्याने या क्रॉसिंगला पूर्ण करत जगातील सर्वात लांब सिंगल-बिल्डिंग स्लॅकलाईनचा विक्रम केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओला यूजर्सचा चांगला प्रतिसाद मिळाला असून यूजर्सने रुज यांना सुपरहीरोची उपमा दिली आहे.

नक्की वाचा – VIRAL VIDEO: मास्क घालून दुकानात घुसणाऱ्या चोराला रंगेहाथ पकडलं, नंतर दांडक्याने केली धुलाई

इथे पाहा तरुणाचा थरारक व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Red Bull Qatar (@redbullqatar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही यूजर्सने त्यांना ‘खतरोंके खिलाडी’ असंही म्हटलं आहे. काहींना तर हा व्हिडीओ अविश्वसनीयच वाटत आहे. तर काही नेटकऱ्यांनी हा वेडेपणा असल्याचं प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हटलं आहे. एका यूजरने म्हटलं, तम्ही माणूस नाही आहात. हे काहीसं यूएफओसारखं काम आहे मित्रा, रिस्पेक्ट. एका अन्य यूजरने म्हटलं, असं करण्याची काय आवश्यकता आहे. स्वत:चा जीव धोक्यात टाकणं ही मजेशीर गोष्ट आहे का?