‘हे आव्हान जे कोणी पूर्ण करेल त्याला अर्धं राज्य देण्यात येईल’ अशी वाक्यं आपण ‘छान छान गोष्टी’ किंवा बाकी पुस्तकं, सी़डीज्, कॅसेट्समधून लहानपणापासून एेकत आलो आहोत. तेव्हापासूनच राजा, राणी, प्रधानजी. सेनापती अशा पदांचा दरारा मनात कायम आहे. त्यातही राजा, राणी म्हटले की एकदम ‘सर्वसत्ताधीश’ वगैरे डोळ्यासमोर येतो. राजाराणीने हुकूम दिला की बास, सगळ्या गोष्टी त्यासारख्याच होणार. लहानपणापासूनच एका मोठ्या राज्याचा राजा किंवा राणी होण्याचं स्वप्न आपल्यापैकी सर्वांनीच पाहिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण या ‘राॅयल’व्यक्तींनाही काही बंधनं पाळावी लागतात. राज्याचं प्रमुखपद सांभाळणं हे काय खायचं काम नाही. प्रत्यक्ष राजा आणि राणीवरही अनेक बंधनं असतात जी त्यांना तोडता येत नाहीत.

जगातल्या उरल्यासुरल्या राजघराण्यांपैकी एक असणारं ब्रिटनचं राजघराणंही असंच आहे. एकेकाळी जवळजवळ संपूर्ण जगावर सत्ता गाजवलेल्या या राजघराण्याच्या सत्ताधीशांनाही काही नियम पा-ळा-वे-च लागतात. ब्रिटनची राणी एलिझाबेथ हीसु्ध्दा त्याला अपवाद नाही. पाहुयात असे काही नियम

१. राजघराण्यातल्या व्यक्तींना मतदानात भाग घेता येत नाही.

राजघराण्यातल्या व्यक्तींना इंग्लंडमधल्या कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदान करता येत नाही. राणीने किंवा राजघराण्यातल्या एका व्यक्तीने एका विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिला तर त्याचा ब्रिटनच्या जनमतावर परिणाम होऊन त्यांची खरी इच्छा या निवडणुकांमध्ये प्रतिबिंबित होणार नाही. आणि लोकशाहीला ते मारक ठरेल. यामुळे राजघराण्याच्या सदस्यांना मतदान करता येत नाही.

२. त्यांची कुठल्याही सरकारी पदावर नेमणूक होऊ शकत नाही.

इंग्लंडमध्ये शेकडो वर्षांपूर्वी लोकशाहीची स्थापना झाली त्यावेळी राजघराण्याच्या निरंकुश आणि सर्वव्यापी अशा सत्तेला सुरूंग लावणे हा एक प्रमुख हेतू होता. गेली अनेक शतकं इंग्लंडच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनातला राजघराण्याचा हस्तक्षेप टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. आधीच प्रभावशाली असलेल्या राजघराण्यातल्या व्यक्तींना लोकशाही व्यवस्थेमधले कुठलेही अधिकार मिळू नयेत यासाठी राजघराण्यातल्या सदस्यांना कोणत्याही सरकारी पदावर घेतलं जात नाही.

वाचा- अटलांटिक महासागरात सापडलेल्या या ११ वर्षांच्या मुलीची थरारक कहाणी

३. कोणीही दिलेली भेटवस्तू त्यांना अगदी अगत्याने स्वीकारावीच लागते

राजघराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीला दिलेली भेटवस्तू ही ब्रिटनच्या सिंहासनाला दिलेली भेट असते. त्यामुळे ती त्यांना स्वीकारावीच लागते. मुंबईतल्या डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्सना भेट म्हणून दिलेली गांधीटोपी त्यांनी प्रेमाने स्वीकारली होती.

४. राजघराण्यातल्या भोजनावेळी इंग्लंडच्या राणीने भोजन थांबवल्यावर बाकी सगळ्यांना जेवण थांबवावंच लागतं.

ब्रिटनच्या राणीसोबत एकाच टेबलावर भोजन करायचा सन्मान मिळालेल्या सगळ्यांना अगदी कडक नियम पाळावे लागतात. राणीने आपलं जेवण संपवलं की त्या टेबलवर बाकी सगळ्यांना आपापलं जेवण थांबवावंच लागतं. बाकी ‘राॅयल’ सदस्यांचीही यातून सुटका नाही.

याशिवाय आणखीही काही मजेदार नियमांविषयी वाचा,

१. राजघराण्यातल्या व्यक्तींना ‘शेलफिश’ खायला मनाई आहे.

हा विचित्र नियम अनेत शतकांपू्र्वी बनवला गेला होता आणि याचं नेमकं कारण स्पष्ट नाही. अॅलर्जी वगैरे टाळण्यासाठी राजघराण्यातल्या व्यक्तींसाठी हा नियम बनवला गेला असावा.
प्रिन्स चार्ल्स कधी मालवणला वगैरे आले तर त्यांना जेवणात तिसऱ्या मसाला वगैरे वाढू नका!

२.इंग्लंडच्या ‘टाॅवर आॅफ लंडन’मध्ये कमीत कमी सात डोमकावळे ठेवावेच लागतात

ही विचित्र परंपराही कधी सुरू झाली हे माहीत नाही. पण टाॅवर आॅफ लंडन मधल्या डोमकावळ्यांची संख्या सातपेक्षा कमी झाली तर इंग्लंडचा राज्यकारभार कोसळतो असा राजघराण्यामध्ये समज आहे. टाॅवर आॅफ लंडनमधल्या डोमकावळ्यांची काळजी घ्यायला स्पेशल स्टाफ तैनात असतो आणि त्यांची संख्या सातपेक्षा कमी कधीच होऊ दिली जात नाही.
मध्ययुगीन कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये डोमकावळ्यांचा उपयोग संदेशवहनासाठी केला जायचा. आपत्कालीन स्थितीत राजघराण्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटू नये म्हणून खबरदारीसाठी हा नियम बनवला गेला असावा.

राजा असो वा रंक. सगळेच नियमांचे बांधील आहेत भाऊ!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even queen elizabeth of england cannot break these rules
First published on: 01-03-2017 at 14:14 IST