Airplane Fare Band Removed : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यात खाद्यतेलाच्या आणि भाजीपाल्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत त्यामुळे सर्वांच्या खिशावर ताण आला आहे. आता त्यात आणखी भर पडली आहे. जर तुम्ही विमान प्रवास करत असाल तरल आजपासून तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.
देशांतर्गत विमानसेवेवर लावण्यात आलेली भाड्यावरील मर्यादा 31 ऑगस्ट म्हणजेच आजपासून हटवण्यात येणार आहे. कोरोना महामारीनंतर विमान प्रवासावरील निर्बंध शिथिल केल्यानंतर सरकारने विमान तिकिटांच्या किमतींमध्ये अनपेक्षित वाढ रोखण्यासाठी उड्डाणाच्या कालावधीनुसार तिकीट दरांवर किमान आणि कमाल फेअर बँड लागू केला होता. मात्र आता तो काढून टाकण्यात येतील असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा थेट परिणाम विमान प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. या बदलामुळे विमान कंपन्यांना त्यांचे भाडे निश्चित करण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळण्याची अपेक्षा आहे.
दैनंदिन मागणी आणि विमान इंधन किमतींचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यानंतर विमान भाडे मर्यादा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशांतर्गत कामकाजाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जवळपास २७ महिन्यांनी भाडे मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला दिली होती. प्रवासभाड्याच्या सीमा गेल्या वर्षी २५ मेपासून विमान वाहतुकीला परवानगी देण्यात आल्यानंतर निर्धारित करण्यात आल्या होत्या.
आणखी वाचा : हत्तीने बाप्पाच्या गळ्यात हार घालून केले स्वागत, पाहा VIRAL VIDEO
आजपासून देशांतर्गत विमानसेवेचे नवीन दर लागू होणार आहेत. ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधीच्या देशांतर्गत उड्डाणांसाठी एअरलाइन्सना आता ग्राहकांकडून २,९०० रुपयांपेक्षा कमी (जीएसटी वगळून) आणि ८,८०० रुपयांपेक्षा जास्त (जीएसटी वगळून) शुल्क आकारण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
जेट इंधनाच्या किमतीत नुकतीच झालेली घसरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. देशव्यापी करोना व्हायरस लॉकडाउननंतर मे २०२० मध्ये देशांतर्गत हवाई प्रवास पुन्हा सुरू झाला, तेव्हा केंद्राने लोअर आणि अप्पर कॅप्स स्थापित केले होते.
ऑक्टोबर २०२१ मध्ये विमान प्रवास पूर्ण क्षमतेने पोहोचला तरीही, सरकारने किंमत मर्यादा समान ठेवल्या. आर्थिकदृष्ट्या कमकुवत विमान कंपन्यांना मदत करण्यासाठी खालच्या स्तरावरील निर्बंध लादण्यात आले होते, प्रवाशांना जास्त शुल्कापासून वाचवण्यासाठी अप्पर कॅप्स लादण्यात आले होते.
आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO
देशांतर्गत विमान तिकीट महागणार?
तांत्रिकदृष्ट्या कोणतीही किंमत मर्यादा नसताना एअरलाइन्स त्यांच्या स्वतःच्या किंमती सेट करण्यास स्वतंत्र झाल्या आहेत. पण अधिक प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एअरलाइन्स फ्लाइट तिकिटांची किंमत कमी करू शकतात. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम म्हणून एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमती विक्रमी पातळीपर्यंत वाढल्यानंतर प्रथम घसरल्या. दर महिन्याला, पहिल्या आणि सोळाव्या दिवशी ATF च्या किमती गेल्या दोन आठवड्यांच्या बेंचमार्क आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतींनुसार बदलल्या जातात.
विस्ताराचे सीईओ विनोद कन्नन यांनी १९ जून रोजी सांगितले होते की, विमान भाड्याची खालची आणि वरची मर्यादा वाढवल्यास त्यांना आनंद होईल. सर्वात मोठी निवड ही विमान कंपन्यांच्या किंमतींवर पूर्ण विवेकी पद्धतीने केली पाहिजे.