Farmer desi jugaad video : शेतीच्या कामासाठी लोकांनी तयार केलेले जुगाड लोकांना अधिक आवडतात. कारण केलेल्या जुगाडामुळे शेतकऱ्याचा अधिक वेळ वाचतो. त्याचबरोबर शेतीचं काम सुध्दा वेळेत होतं असं अनेकदा पाहायला मिळालं आहे. शेतीच्या कामासाठी तयार केलेले जुगाड सोशल मीडियावर अधिक व्हायरल सुध्दा झाले आहेत.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. देश कितीही प्रगत झाला असला तरी देशातील बहुतेक लोक आजही शेतीतून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियावर एका शेतकऱ्यानं केलेल्या जुगाडाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

सध्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणाऱ्याकडेही केंद्र आणि राज्य सरकारचा भर आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याचा जूगाड पाहून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे.आपले कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यानं केलेली ही ट्रीक नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. परंतु नक्की या शेतकऱ्यांनं केलं काय? अशा नक्की कोणत्या पिकांवर त्यानं हा जुगाडाचा प्रयोग केला? आणि त्यानं हे कसं काय केलं? असे प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तेव्हा हा लेख जाणून घेऊन तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. तेव्हा तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हालाही कदाचित या व्हिडीओतून प्रेरणा मिळेल. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे.

एका तरुणाने शेतात पाटाचं पाणी द्यायला भन्नाट जुगाड केला आहे. या तरुणानं कागदाचा योग्य वापर करुन कष्ट न करता अगदी सहज एका पाटातून दुसऱ्या पाटाला पाणी दिलंय. हा व्हिडीओ पाहून तुमचेही कष्ट वाचतील

पाहा व्हिडीओ

शेतीच्या एखाद्या कामासाठी शेतकरी युट्यूब आणि इतर माध्यमातून प्रत्येकवेळी जुगाड करण्याचा प्रयत्न करीत असतो. अनेक तरुणांना प्रयोग करण्यात यश आलं आहे. तर काहीजण रोजनव्याने प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तरुण शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत आहे. त्याचबरोबर त्यातून चांगले पैसे सुध्दा कमावत असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे.