राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे नेहमीच आपल्या थेट वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. तसेच, त्या अनेक ठिकाणी भेट देतात आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या निवास्थानी भेट दिली. यावेळी त्यांना वसंत नागदे यांचा अतिशय अभिनव पैलू पाहायला मिळाला. ही गोष्ट त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेयर करत वसंत नागदे यांचं कौतुक केलं आहे.

काल म्हणजेच २९ सप्टेंबरला खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच या घटनेची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये दिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या मुलाचं नुकतंच निधन झालं आहे. मात्र अशा परिस्थितीतही ते आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी आपल्या सुनेच्या हस्ते सुप्रिया सुळे यांचं स्वागत केलं. यावेळी सुनबाई पाहुण्यांना कुंकू लावताना बिचकत होत्या. मात्र वसंतरावांनी लगेचच आपल्या सुनेला आधार देत प्रोत्साहन दिले. दरम्यान, हा संपूर्ण प्रसंग अतिशय भावनिक आणि अंगावर शहारे आणणारा होता.

आत्मनिर्भर पुणेकर तरुणी श्रीमंतांच्या यादीत! एकूण संपत्ती आहे १३ हजार ३८० कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार सुप्रिया सुळे नेहमीच स्त्री सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून वसंत नागदे यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, “हा सगळा प्रसंग अतिशय भावूक करणारा, नवी दिशा देणारा आणि आश्वासक असा होता.” या व्हिडीओला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.