तुम्ही काही महिन्यांपूर्वी जर्मनीच्या एका कर्मचाऱ्याची गोष्ट ऐकलीच असेल. हा पठ्ठा वाहतूक कोंडीमुळे खूपच कंटाळला होता. वाहतूक कोंडीमुळे ऑफिसला पोहोचायला उशीर व्हायचा म्हणून तो चक्क पोहोत ऑफिसला जायचा. अशाच एका वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या माणसाची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. चालकांचा मूर्खपणा आणि बेशिस्त वागण्यामुळे हा माणूस तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडायचा. शेवटी ही नेहमीचीच समस्या त्यानं आपल्या पद्धतीनं हाताळायची ठरवली.

Viral Video : पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं

Video : हत्तीला सलाम ठोकायला गेला अन् जीव गमावून बसला

चाई असं या प्रवाशाचं नाव असून रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी झालेली पाहून एकेदिवशी तो ब्रश आणि पांढरा रंग घेऊन आला. रस्त्यावर रंगाने दिशादर्शक रंगवू लागला. काही बेशिस्त चालकांना सरळ जायचे असले तरी ते जिथे जागा मिळेल तिथे आपली गाडी नेऊन उभी करतात. त्यामुळे एखाद्याला उजवीकडे किंवा डावीकडे जायचं असेल तर त्याला गाडी नेता येत नाही. अशा वागण्यामुळे चाईची बस कितीतरी वेळ कोंडीत अडकून पडायची. म्हणूनच त्यानं रस्त्यावर योग्य आखणी करून डाव्या, उजव्या वळणासाठी आणि सरळ जाण्यासाठी ठराविक जागा आखून ठेवल्या. आपल्या आखणीमुळे लोक कदाचित सुधारतील असा त्याचा समज पडला. खरं तर त्याचं एकीकडे सोशल मीडियावर कौतुक होत आहे तर दुसरीकडे मात्र चीनच्या पोलिसांनी त्याला मोठा दंड आकारला आहे. रस्ता रंगवताना त्याने परवानगी घेतली नव्हती, दुसरं म्हणजे त्यानं या कामासाठी स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला असं पोलिसांचं म्हणणं होतं. कारण त्याचं काम सुरू असताना अपघात होण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.