Tomato Optical Illusion Photo Viral : टोमॅटोचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडले आहेत. टोमॅटोचे वाढते भाव लक्षात घेता लोकांच्या खिशाला कात्री लागली आहे. त्यामुळे अनेक जण आर्थिक विवंचनात सापडले असतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु, त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. अशातच आता चक्क टोमॅटो ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण चेरीच्या ट्रे मध्ये लपलेला एक टोमॅटो शोधणं म्हणजे लोकांसाठी तगडं आव्हानच असणार आहे. कारण ज्यांच्याकडे तीक्ष्ण बुद्धी आहे, अशा लोकांनाचा हा टोमॅटो ५ सेकंदात शोधता येणार आहे. त्यामुळे बुद्धीला कस लावा आणि शोधा चेरीच्या ट्रेमध्ये लपलेल्या टोमॅटोला. तुमची वेळ सुरु झालीय.

थांबा! तुम्हाला दिलेली टोमॅटो शोधण्याची वेळ संपली आहे. ज्यांना टोमॅटो दिसला त्या सर्वांचे अभिनंदन. पण ज्यांना टोमॅटो अजूनही शोधता आला नाही, त्यांनी गरुडासारख्या नजरेनं पाहिलं तर नक्कीच टोमॅटो फोटोत दिसेल. टोमॅटोला शोधणं खूप अवघड नाही पण तितकच सोपंही नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, त्यांनी योग्यप्रकारे त्या बुद्धीचा वापर करून टोमॅटोला शोधण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला टोमॅटो दिसलाच नाही, तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, टोमॅटो नेमका कुठं लपला आहे.

नक्की वाचा – भारतात आहे जगातील सर्वात मोठी ‘ऑफिस बिल्डिंग’, ठिकाणाचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेरीच्या ट्रेमध्ये उजव्या बाजूला मरुन रंगाची चेरी आहे. पण ते टोमॅटो नाही. काही लोकांनी याच चेरीला टोमॅटो समजण्याची चूक केली असावी. पण खूप गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही. कारण कारण तुम्ही खूप बारकाईने फोटोच्या उजव्या बाजूला पाहिलं, तुम्हाला लार रंगाचा टोमॅटो दिसेल. टोमॅटोच्या वरच्या भागात हिरव्या रंगाचा देठ तुम्ही पाहू शकता. कारण चेरीच्या आणि टोमॅटोच्या देठात फरक आहे. त्यामुळे हिरव्या रंगाचा देठ असलेला टोमॅटो तुम्हाला या फोटोत नक्कीच दिसेल, जर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असेल.

या फोटोत पाहा लपलेला टोमॅटो

See Hidden Tomato In This Photo