माणसांच्या सुस्तावलेल्या बुद्धीला चालना देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ पाहून मनोरंजनाचा आस्वाद घेण्यापेक्षा फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधण्यात बुद्धीचा कस लागतो. अनेक विचारांच्या ताण तणावामुळं बुद्धीमान व्यक्तींनाही अशा फोटोमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधता येत नाहीत. पण तुमच्याकडे तल्लख बुद्धी असेल, तर व्हायरल झालेल्या या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत शहामृगांच्या कळपामध्ये लपलेली छत्री तुम्हाला शोधता येईल. १० सेकंदात तुम्ही छत्री शोधली, तर तुम्ही नक्कीच जिनीयस आहात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या फोटोत शहामृगांच्या कळपात एक छत्री लपलेली आहे. ही छत्री शोधण्यासाठी तुम्हाला गरुडासारखी तीक्ष्ण नजर ठेऊन फोटो पाहावा लागेल. ही छत्री शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदांचा वेळ असणार आहे. तुम्ही अतिशय बारकाईने फोटो पाहिल्यास तुम्हाला एका शहामृगाच्या जवळ छत्री ठेवलेली पाहता येईल. पण जर का तुम्ही फोटोकडे गांभीर्याने पाहिलं नाही, तर तुम्हाला छत्री दिसणार नाही. हळूहळू घड्याळाचे काटे फिरत आहेत आणि वेळ पुढे जात आहेत. त्यामुळे छत्री शोधण्यासाठी बुद्धीला चालना द्या आणि तुमची नोंद जिनीयस माणसांमध्ये करा.
तुम्हाला या फोटोत छत्री दिसली का? तुमच्याकडे अवघ्या काही सेकंदांचा वेळ राहिला आहे. अजूनही तुम्हाला छत्री पाहता आली नसेल, तर तुम्ही छत्री शोधणं थांबवू शकता. कारण तुमची वेळ आता संपलेली आहे. तुमच्यापैकी किती जणांनी छत्री शोधली? छत्री नेमकी कुठे आहे? असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. पण तुम्ही गोंधळलेल्या स्थितीत राहू नका. कारण खाली दिलेल्या फोटोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, शहामृगांच्या कळपात छत्री कुठे लपली आहे.
या फोटोत पाहा छत्री कुठे आहे?
