फिनलँडबरोबरच जागतिक राजकारणामध्ये इतिहास घडवणाऱ्या आणि याच वर्षी जानेवारी महिन्यात जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवणाऱ्या सना मरीन यांचे एक फोटोशूट सध्या वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान पदी विराजमान झालेल्या सना यांनी ट्रेण्डी या मासिकाच्या ऑक्टोबरच्या पुरवणीसाठी विशेष फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये त्यांनी लो नेक ब्लेझर घातलं होतं. मात्र त्यांनी ब्लेझरच्या आतमध्ये शर्ट घातलं नव्हतं. त्यामुळेच आता या मासिकाबरोबरच साना यांच्यावरही टीका होताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे त्यांना पाठिंबा देत अशाच प्रकारचे स्वत:चे लोक नेक कपडे घालून पोस्ट करणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. त्यामुळेच आता या शर्टलेस फोटोशूटवरुन दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.

नक्की पाहा >> साना मरीन यांचे फोटो पाहून थक्क व्हाल

ट्रेण्डीच्या प्रकाशक असणाऱ्या ए-लेहडेट ओए या माध्यम समुहाच्या महिला संचालक असलेल्या मारी पॅलोसॅलो-ज्युसिनमाकी यांनी सीएनएनशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या फोटोशूटमुळे आणि मासिकाच्या कव्हर पेजमुळे आमच्यावर टीका होत असल्याचे म्हटले आहे. ९ ऑक्टोबर रोजी हे मासिक प्रकाशित झाल्यानंतर सोशल मीडियावरुन अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याचे मारी सांगातत. वर वर सांगायचे झाल्यास पुरुषांच्या मते हा फोटो चुकीचा आहे तर महिलांना हा फोटो फार आवडला आहे असंही मारी यांनी म्हटलं आहे.

फोटो सौजन्य: Jonas Lundqvist/A-Lehdet Oy

खरं तर यावरुन एवढा वाद होईल असं कंपनीला वाटलं नसल्याचंही मारी यांनी मान्य केलं आहे. “आम्ही या पूर्वीही अशाप्रकारचे फोटो कव्हर पेजवर छापले आहेत. हे महिलांच्या फॅशनसंदर्भातील मासिक असल्याचे ते सहाजिक आहे. आम्ही अनेकदा महिलांनी केवळ ब्लेझर घालून केलेल्या फोटोशूटमधील मधील फोटो छापलेत. तेव्हाही त्या महिलांनी ब्लेझरच्या आत काहीच घातलं नव्हतं. अनेक वर्षांपासून अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या असे फोटो आम्ही छापलेत तेव्हा असा वाद कधीच झाला नाही. त्यामुळे आता झालेला वाद हा आश्चर्यचकित करणार आहे,” असंही मारी म्हणाल्या.

मात्र यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर साना यांच्या अनेक समर्थकांनी सोशल नेटवर्किंगवर #imwithsanna या हॅशटॅग अंतर्गत स्वत:चे साना यांनी परिधान केलेल्या कपड्यांप्रमाणेच कपडे घालून फोटो पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

#imwithsanna #sannamarin #tyttöjenpuolella #trendimag

A post shared by Trendi & Lily (@trendimag) on

अनेकांनी अशाप्रकारच्या पोस्ट केल्या असून हा हॅशटॅग सध्या फिनलॅण्डमध्ये चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Antakaa palaa #imwithsanna #trendimag⠀ ⠀ Me Trendissä olemme seuranneet kuvianne ja lukeneet viestejänne ja kommenttejanne ilosta ymmyrkäisinä, ylpeydestä halkeilleina ja älyttömän voimaantuneina – kiitos Päätoimittaja Mari Karsikkaan sanoin:⠀ ⠀ “Pian Trendin ilmestymisen ja kohun alkamisen jälkeen naiset alkoivat jakaa rintavaon paljastavia kuvia #imwithsanna-tunnisteella somessa. En ole varma, kuka ehti ensin, mutta ei ainakaan Trendi. Someilmiön synnyttivät yksittäiset naiset, joille Sanna Marinin parjaus riitti. Olen heille hyvin kiitollinen.”⠀ ⠀ Lue biossa olevan linkin kautta päätoimittajan koko kirjoitus siitä, mitä #imwithsanna-kohu on opettanut.

A post shared by Trendi & Lily (@trendimag) on

मात्र यासंदर्भात साना यांच्या कार्यालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही असं सीएनएनने म्हटलं आहे.