भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सर्व स्तरांमधून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटा पडत असल्याचे दिसत आहे. असाच एक प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीरमधील तरुण म्हणून चक्क एका पॉर्नस्टारचा फोटो रिट्विट केला आहे. भारतावर टीका करण्याच्या नादात पाकिस्तानी नेत्याने आणि अधिकाऱ्याने स्वत:चे हसू करून घेण्याची ही मागील काही दिवसांमधील दुसरी घटना आहे.

जॉनी सीन या पॉर्नस्टार्सचा फोटो असणारे काश्मीर संदर्भातील एक खोटे ट्विट व्हायरल झाले होते. ‘अनंतनागमध्ये दगडफेक झाली असून त्यात पॅलेट गनमुळे युसूफ नावाच्या तरुणाचा डोळा फुटला आहे. सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला हवा,’ अशा कॅप्शनसहीत जॉनी सीनचा एका महिलेबरोबरच फोटो ट्विट करण्यात आला होता. हेच ट्विट बासित यांनी रिट्विट केले आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर बासित यांनी हे ट्विट डिलीट केले असले तरी अनेकांनी त्याचे स्क्रीनशॉर्ट्स आता व्हायरल केले आहे.

Elon Musk China Visit
भारताचा दौरा रद्द केल्यानंतर टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क अचानक चीनच्या दौऱ्यावर
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

अनेक भारतीयांनी हे स्क्रीनशॉर्ट शेअर करत बासित यांच्यावर टीका केली आहे.

खरंच कहर

आता तो दगडफेक करणारा झाला

जॉनी थेट अनंतनागमध्ये?

हे अधिकारी आहेत

हा पुरावा

नक्की वाचा कहर! पाकिस्तानने ‘United Nations’ ऐवजी ‘UNO गेम’कडे केली भारताची तक्रार

भारतावर टिका करताना पाकिस्तानच्या नेत्यांनी अशाप्रकारे खोटे तसेच मजेदार व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. खोटे व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी थेट पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनाही ट्विटरने नोटीस पाठवली आहे. तर याआधी पाकिस्तानच्या सिनेटचे सदस्य रेहमान मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजेच युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केले होते.