Ex Xiaomi Director Affairs: प्रसिद्ध टेक कंपनी शाओमीच्या कथित संचालकाचे २०० तरुणींबरोबर विवाहबाह्य संबंध असल्याची अफवा जून महिन्याच्या सुरुवातीला पसरली होती. चीनमधील शाओमी कंपनीचा कथित संचालक फेंग डेबिंगचे अनेक तरूणीशी संबंध असल्याची बातमी पसरली होती. फेंग डेबिंगने शुगर डॅडी करार करून २०० हून अधिक तरूणींशी संबंधित प्रस्थापित केले होते. लैंगिक संबंधाच्या बदल्यात तरुणींना पैसे किंवा इतर बाबतीतली मदत केली जायची. या प्रकरणी आता एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
फेंग डेबिंगच्या विवाहबाह्य संबंधाचा भांडाफोड खुद्द त्याच्या पत्नीनेच केला आहे. फेंगची इतर महिलांपासून सहा ते सात मुले आहेत, हे कळल्यानंतर पत्नीने त्याचा खरा चेहरा जगासमोर आणला.
पण या प्रकरणात जेव्हा शाओमी कंपनीने फेंग डेबिंगचे सत्य समोर आणले, तेव्हा आणखी एक धक्का बसला.
संचालक नाही तर सामान्य कर्मचारी
फेंग हा बोगस व्यक्ती असून तो शाओमीचा संचालक नाही तर कंपनीच्या एका कॅन्टीनमध्ये काम करणारा सामान्य कर्मचारी होता, असा दावा आता कंपनीने केला आहे. मदरशिप वृत्तपत्रातील बातमीनुसार, शाओमी कंपनीचे माध्यम प्रतिनिधी वांग हुआ यांनी म्हटले की, फेंग शाओमी कंपनीचा संचालक कधीही नव्हता.
वांग हुआ यांनी पुढे म्हटले की, फेंग सप्टेंबर २०१६ इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शाओमीच्या एका स्वयंपाकघरात सामान्य कामगार म्हणून कामाला लागला होता. त्यानंतर दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे त्याला त्याच वर्षी कामावरून काढून टाकण्यात आले. स्वयंपाकघरात तो केवळ भाजी चिरण्याचे काम करत होता. ब्रँड डायरेक्टर अशा कोणत्याही पदावर त्याची नियुक्ती केलेली नव्हती, असेही वांग यांनी स्पष्ट केले.
फेंगने अनेक तरुणींबरोबर शुगर डॅडी करार केले असल्याची चर्चा चीनी सोशल मीडियावर होत आहे. यासाठी तरुणींना भरमसाठ पैसे देण्याचे आश्वासन दिले जायचे. या करारात लैंगिक संबंधाची सहमतीही दिलेली असायची.
फेंगने चीनमध्ये शिक्षणासाठी आलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांना दरमहा एक भारतीय रुपयांमधील १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले गेले. पण तरुणींना प्रत्यक्षात पैसे मिळाले का? याची कोणतीही माहिती चीनी माध्यमांनी दिलेली नाही.
प्रकरण उघडकीस कसे आले?
चीनमधील माध्यमात आलेल्या बातम्यानुसार, फेंगचा मोबाइल त्याच्या पत्नीच्या हाती लागल्यानंतर त्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहून त्याला धक्काच बसला. यानंतर हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले.