सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेकांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी मोठी मदत झाली. सध्या सोशल मीडियावर ओयो या अॅपच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. Oyo Rooms या कंपनीने बरंच नाव कमावलं आहे.

या कंपनीचं यश पाहून मोठ मोठे व्यावसायिक, गुंतवणूकदारही चकीत झाले आहेत. या कंपनीद्वारे पर्यटकांचा कल आणि त्यांची गरज समजून विविध शहरांमध्ये त्यांना राहण्याची उत्तम सुविधा पुरवण्यात येते. सध्या यशाच्या शिखरावर असलेल्या या कंपनीची सुरुवात १७ वर्षांच्या एका तरुणाने केली होती. त्याने सुरु केलेल्या ‘ओयो रुम्स’ची उलाढाल आज ६००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्याशिवाय हा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. या कंपनीचा पाया घालणाऱ्या त्या १७ वर्षीय तरुणाचं नाव आहे रितेश अग्रवाल. विविध वेबसाईट्सवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, रितेशने त्याचं अभियांत्रिकीचं शिक्षण सोडून ‘ओयो’ची सुरुवात केली होती.

वाचा : जपानच्या फर्स्ट लेडीविषयीच्या या गोष्टी माहिती आहेत का?

नुकतंच या कंपनीत जपानच्या ‘सॉफ्ट’ बँकेने अडीच कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली. या बँकेने ‘फ्लिपकार्ट’नंतर सर्वाधिक गुंतवणूक ‘ओयो’मध्ये केली आहे. त्यामुळे ही नक्कीच प्रशंसनीय बाब ठरत आहे. रितेशचा प्रवास फारच खडतर होता. एकेकाळी घरभाडे भरण्याचे पैसेही नसलेल्या रितेशला मिळालेल्या या यशाची कोणी कल्पनाही केली नसावी. पण, इथे त्याच्या जिद्द आणि चिकाटीला दाद द्यावी तितकी कमीच आहे. एका मुलाखतीत रितेशने त्याच्या या प्रवासाचा उलगडा केला. ‘एकेकाळी माझ्याकडे घरभाडे देण्याइतपतही पैसे नसायचे. कित्येक रात्री मी कुठेही झोपायचो’, असं तो म्हणाला होता.

वाचा : गरिब घरातील हुशार मुलगा, जपानचा जावई ते बुलेट ट्रेनचा मुख्य सल्लागार! संजीव सिन्हांचा थक्क करणारा प्रवास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीच्या दिवसांमध्ये रितेशने ‘ओरावल’ नावाची एक वेबसाईट तयार केली होती. ज्यावरुन तो स्वस्त दरातील आणि सर्व सुविधा असलेल्या हॉटेल्स संदर्भात माहिती पुरवायचा. पण, ओरावल या नावाला कोणी फारशी पसंती दिली नाही. त्यामुळे त्याने २०१३ मध्ये त्याचं नाव बदलून ‘ओयो’ असं केलं आणि ओयो रुम्सच्या यशस्वी प्रवासाला सुरुवात झाली.