Viral car video: ट्रकच्या मागे लिहिलेली अनेक मजेशीर वाक्ये तुम्ही पाहिली असतील. देशभरातील लोक मजेदार कोट्स लिहिण्यासाठी ओळखले जातात आणि त्यांच्या मागे लिहिलेल्या ओळी सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर ओळीमुळे ट्रक नव्हे तर कार चर्चेचा विषय बनली आहे. भारतात गाड्या आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. गाड्यांच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून, या सगळ्याच गाड्या पुण्याच्याच आहेत की काय, असाही प्रश्न पडतो. ‘मेरा भारत महान’ आणि ‘हॉर्न ओके‘ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. त्याशिवाय काही ट्रकवाले, ऑटोचालकांच्या आत लपलेली कला याच पाट्यांद्वारे दिसून येते. जसं की, शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणूनही गाड्यांच्या मागे अशी वाक्यं लिहिणं हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे. दरम्यान, अशाच एका कारच्या मागे लिहिलेलं वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आई-वडिलांचा कृपा, अण्णांची कृपा, पप्पांची कृपा, देवीची कृपा, देवाची कृपा, यांसारख्या ”टिंबटिंबची कृपा’वाल्यापाट्या रिक्षा-टॅक्सी-ट्रकच्या मागे हमखास दिसतातच! त्यातही आपल्या व्यवसायाचं नाव देऊन त्याची कृपा मानण्यात धन्यता मानणारा अवलियाही आपण पाहिला आहे. मात्र सध्या एका कारचा व्हिडीओ व्हायरल होतोय, त्यामध्ये एका माणसानं कारच्या मागे असं काही लिहलंय की लोक म्हणताहेत याला म्हणतात बायकोचा धाक..आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नेमकं लिहलंय तरी काय? तर या पठ्ठ्याने कारच्या मागे प्रामाणिकपणे “बायकोची कार” असं लिहलं आहे. भले ही कार आता मी चालवतोय पण कार बायकोचीच आहे.
पाहा व्हिडीओ
कारचा हा मजेशीर व्हिडीओ bhushan_jadhav22 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बायकोची दहशत अशी पाहिजे . दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांना पाहिला, तर हजारो युजर्सनी त्यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स केल्यात. एका युजरने लिहिले की, भय इथले संपत नाही; पण हे चांगले आहे. दुसऱ्याने लिहिले की, नंबर प्लेट कमाल आहे. तर काहींनी मिश्कील सवाल केलाय की, काय भावा, हुंड्यात मिळालेली कार आहे वाटतं?