Viral Photo: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. “हॉर्न ओके” हे तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

टेन्शनमधून रिलीज व्हायचे असेल तर बरेचजण काहीबाही उपाय सांगत असतात. त्यातलाच एक जालीम इलाज काय माहिती आहे? बस्स, ट्रकच्या मागे लिहिलेल्या शायरी किंवा संदेश वाचा. चेहऱ्यावर नक्की हसू फुलेल. देशभरात फिरणाऱ्या या ट्रकची खासियत म्हणजे त्यांवर लिहिलेली शायरी.रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते.

दरम्यान अशाच एका ट्रकचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. “कितीही मोठे झालो तरी आई म्हणजे आपले विश्व” अशा आशयाची पाटी सध्या तुफान व्हायरल होत आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविणा भिकारी,असं म्हटलं जातं.

आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून अहोरात्र वाटणाऱ्या काळजीमध्ये, मुलांवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करण्यासाठी असलेल्या मातृशक्तीमध्ये.

पाहा फोटो

हेही वाचा >> रिव्हर राफ्टींगदरम्यान मुख्य राफ्टरच गेला वाहून; ऋषिकेशमधला ‘हा’ VIDEO पाहून पोट धरून हसाल

एरवी, ट्रक व त्यांचे चालक शांतपणे आराम करताना पाहायचे असतील तर ढाबेच गाठावे लागतात. कारण, रस्त्यावर ते सतत धावत असतात.ट्रकचालक, क्लीनर सहा-सहा महिने घराच्या बाहेर असतात. ट्रक हेच आपले घर वाटावे, आपल्या मनातले इतरांना कळावे, हाच या पेंटिंगमागचा उद्देश. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आपल्या ट्रकवरील नितांत प्रेम. इतर ट्रकपेक्षा आपला ट्रक एकदम मस्त दिसला पाहिजे, हाही उद्देश असतोच.