Pune Rain Update : महाराष्ट्राचे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर नेहमी चर्चेत असते. येथील ऐतिहासिक वास्तु, प्राचीन मंदिरे, पुणेरी भाषा, शिक्षण, पुणेरी पाट्या, खाद्यसंस्कृती इत्यादी गोष्टी नेहमी चर्चेचा विषय ठरतात. पुण्यात थोडा जरी पाऊस पडला तरी पुण्यात ठिकठिकाणी पूर येतो, नदी नाले भरतात. लोकांना घराबाहेर पडणे कठीण जाते, वाहतूक कोंडी होते.

सध्या अशीच परिस्थिती पुण्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे पुणे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे पुण्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सोशल मीडियावर पुण्यातील काही भागातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील भयावह परिस्थिती दिसून येईल.

एका युजरने रस्त्यावर पाणी साचल्याचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे फोटो पाहा, पुणे दरवर्षी पावसाळ्यात वाईट शहर म्हणून नवीन रेकॉर्ड बनवत आहे. चला पोहायला जाऊ या.”

या युजरने व्हिडीओ शेअर करत लिहिलेय, “बाणेर, मुळा नदीला पूर येईल अशी परिस्थिती”

हेही वाचा : पुण्यात पावसाचा हाहाकार! टिळक पूल पाण्याखाली तर पुराच्या पाण्यात मधोमध अडकली कार, थरारक VIDEO तुफान व्हायरल

एका युजरने एका इमारतीचा फोटो शेअर केला आहे. या इमारतीचे नाव आहे ‘रिव्हर व्हू ए’ या इमारतीच्या खाली नदीसारखे पाणी साचलेले दिसत आहे.

एका युजरने झेड पुलावरील व्हिडीओ शेअर केले आहेत.

या युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर एवढे पाणी साचले आहे की लोकांना घराबाहेर पडणे अशक्य आहे.

एका युजरने खडकवासला धरणारे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकरांनो घरी रहा, सुरक्षित रहा.”

एका युजरने रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये ‘स्मार्ट सिटी’ लिहीत टीका केली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या परिसरात पाणी गेल्याचे दिसून येईल.

एका युजरने खराडीच्या पुलाचे फोटो शेअर केले आहे. एका फोटोमध्ये खराडीचा पुल नेहमी कसा दिसतो, हे दाखवले आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये पावसाच्या पाण्यामुळे पुल पाण्याखाली गेल्याचा दिसतोय.

वादळी पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाने हाहाकार दिसून येत आहे. खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे काही ठिकाणी नुकसान झाले आहे. पुण्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे याशिवाय पालिकेने आपत्कालीन यंत्रणेला दक्ष राहण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. पुण्याचे पालक मंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे.