आपल्या देशात कोणतंही वाहन चालवण्यासाठी लायसन्स आवश्यक असते. लायसन्स मिळवण्यासाठी भारत सरकारने वयासह इतर काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच एका तीन फुटाच्या व्यक्तीला ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं आहे. गट्टीपल्ली शिवलाल हे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणारे देशातले पहिले सर्वात कमी उंचीचे व्यक्ती ठरले आहेत.

केवळ तीन फूट उंच असलेल्या कुकटपल्ली येथील रहिवासी असलेल्या ४२ वर्षीय शिवलाल यांना सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करावा लागत होता. मात्र, या प्रवासादरम्यान त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. शिवलालला गाडी चालवता येत नसल्याने प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाचा ते वापर करत होते. त्यांनी कॅबचा वापर देखील करून पाहिला. परंतु लोक त्यांना टोमणे मारायचे, त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत होते. या सर्व गोष्टींमुळे अस्वस्थ झालेल्या शिवलाल यांनी कालांतराने स्वतःच वाहन चालवायला शिकण्याचा निश्चय केला.

वाहन चालवायला शिकताना त्यांना अनेक अडचणी येत होत्या. पण एकदा त्यांनी अमेरिकेतील एका ठेंगण्या व्यक्तीचा गाडी चालवताना व्हिडीओ पाहिला आणि त्यांचा आत्मविश्वास बळावला. देशात त्यांनी अक ठिकाणी ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अर्ज केले. मात्र त्यांना सर्वांनी नकार दिला. त्यामुळे  गाडी चालवण्याचं संपूर्ण तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांनी अमेरिकेचा प्रवास केला. त्यानंतर हैदराबादमध्ये कस्टम कारचं डिझाइन करणाऱ्या एका व्यक्तीबाबत त्यांना माहिती मिळाली. या व्यक्तीकडून त्यांनी कारमध्ये काही बदल करून घेतले. या कारमधली पेडल्स नेहमीपेक्षा उंचावर होती आणि माझे पाय तिथपर्यंत पोहोचू शकत होते, असं शिवलाल यांनी सांगितलं.  

शिवलाल आता आपल्या पत्नीला कार चालवायला शिकवत आहे आणि अधिक ठेंगण्या लोकांना स्वतंत्र बनण्यास मदत करण्यासाठी शहरात एक विशेष ड्रायव्हिंग स्कूल उघडण्याची त्याची योजना आहे. विनागीअर्सच्या त्याच्या स्वयंचलित वाहनाला तेलंगणा सरकारने देखील मान्यता दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी उंची असलेल्या व्यक्तींच्या गटात प्रथमच ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यानं तेलुगू बुक ऑफ रेकॉर्ड्स, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये शिवलाल यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.