Buffalo Race Video Viral : कर्नाटकात गेल्या ७०० वर्षांपासून एक अनोखी परंपरा सुरू आहे, जी मोठ्या थाटामाटात आयोजित केली जाते. यावेळीही शनिवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यात या कांबळा शर्यतीचा म्हणजेच म्हशींच्या शर्यतीचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा रोमांचक व्हिडीओचा नेटकरी मंडळी आनंद घेताना दिसून येत आहे.

कर्नाटक राज्यातील उडीपी, दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. दरवर्षी किनारपट्टी भागात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘बफेलो रेस’ला ‘कांबळा शर्यत’ असंही म्हणतात. लोकांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि प्रकाशात न्हाऊन निघालेल्या स्टेडियममध्ये याचा आनंद लुटला. या शर्यतीत म्हशींची एक शर्यत ठेवली जाते जी आश्चर्यकारक असते. पाणी आणि चिखलाने बनवलेल्या ट्रॅकवर म्हशींची शर्यत रंगवली जाते. या दरम्यान म्हशींना सजवून वेगाने धावण्यासाठी तयार केलं जातं.

Healthy Morning Routine
झटपट वजन कमी करायचंय? सकाळी उठल्या-उठल्या करा ‘या’ ६ गोष्टी; महिन्याभरात कमी होईल वजन, दिसाल स्लिम-ट्रिम!
Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Narendra modi
Vision 2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं पुढच्या २५ वर्षांचं नियोजन, म्हणाले, “१५ लाखांहून अधिक…”
use molds 40 years ago on manufacturers for sugar gathi Pune
साखर गाठीसाठी नवे साचे मिळेनात; उत्पादकांवर ४० वर्षांपूर्वीचे साचे वापरण्याची वेळ

कांबळा शर्यत म्हणजेच म्हशींची शर्यत पारंपारिकपणे स्थानिक तुलुवा जमीनदार आणि दक्षिण कर्नाटकातील आणि उडुपीमधील किनारी जिल्हे, केरळमधील कासारगोड यांनी आयोजित केली होती. हा उत्सव ‘भगवान मंजुनाथ’ यांना समर्पित असल्याचं मानलं जातं. त्यांना ‘भगवान शिव’चा अवतार देखील म्हटलं जातं. या खेळाच्या माध्यमातून चांगल्या पिकासाठी देवाला प्रसन्न केलं जातं, असं म्हणतात. दुसर्‍या मान्यतेनुसार, हा राजघराण्याचा खेळ असायचा.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आयुष्यात पहिल्यांदा कुत्रा पाहिला तेव्हा या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहा…तुम्ही सुद्धा प्रेमात पडाल

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL : याला म्हणतात नशीब! रातोरात करोडपती झाला अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर…२७० रूपयाच्या लॉटरीनं पालटलं नशीब

‘कांबळा रेस’ दोन समांतर ‘रेसिंग ट्रॅक’वर आयोजित केली जाते. शर्यतीदरम्यान ट्रॅकवर पाणी आणि चिखल केला जातो. कांबळा रेसिंग ट्रॅक १२० ते १६० मीटर लांब आणि ८ ते १२ मीटर रुंद आहेत. कांबळा शर्यती दरम्यान, २ म्हशी बांधल्या जातात आणि खेळाडू (जॉकी) त्यांना चालवतात. चिखलाने भरलेल्या ट्रॅकवर होणाऱ्या ‘कांबळा रेस’वर लक्ष ठेवण्यासाठी अनेक पंचही असतात. क्रिकेटच्या सामन्यांप्रमाणेच ‘कांबळा शर्यती’च्या वेळी फ्लडलाइट्सचा वापर केला जातो. पूर्वी विजेत्यांना नारळ दिलं जायचं, पण आता त्यांना सुवर्णपदके, ट्रॉफी आणि इतर मौल्यवान वस्तू देऊन गौरविण्यात येतं.