क्षितिजापर्यंत पसरलेला तो शांत आणि अथांग समुद्र प्रत्येकाला आवडतो. मात्र हाच समुद्र जेव्हा अशांत होतो आणि उंचच उंच लाटा उसळतात तेव्हा भय हे वाटतंच. अशा भयंकर लाटांनाही मात देत प्रवास करत जर्मनीच्या सेबॅस्टियन स्टडनरने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलाय. जवळपास ८६ फुट इतक्या उंचच उंट लाटांवरून प्रवास करत या जर्मन सर्फरने हा विश्वविक्रम रचलाय. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डची चर्चा सुरूय.

मिस्टर स्टुडटनर यांनी ऑक्टोबर २०२० मध्ये पोर्तुगालमधील प्राया डो नॉर्टे यांनी नाझारेच्या किनार्‍याजवळ हा विक्रम आपल्या नावे केला होता. जेव्हा त्यांनी २६.२१ मीटर (८६ फूट) भयंकर लाटेतून सर्फिंग केलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) ने याचा एक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करत ही माहिती दिली आहे. या राइडला २०२१ च्या रेड बुल बिग वेव्ह अवॉर्ड्समध्ये सर्वात मोठा टो अवॉर्ड मिळाला. त्याच्या या अफलातून सर्फिंग परफॉर्मन्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : वानर आणि लहान मुलामध्ये रंगली जबरदस्त फाईट, लढाईचा कसा झाला शेवट? पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ पाहून लोक या अनोख्या कामगिरीचं कौतुक करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ७६०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. २४ मे २०२२ रोजी एका निर्णायकाच्या उपस्थितीत स्पेशल सर्टिफिकेट सेरेमनीमध्ये या कामगिरीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

हा कार्यक्रम पोर्तुगालमधील प्रिया डो नॉर्टे येथील प्रसिद्ध लाईटहाऊसमध्ये आयोजित करण्यात आला होता, जो जगातील सर्वात मोठ्या लाटांपासून संरक्षण देतं. मिस्टर स्टुडटनरच्या विस्मयकारक रेकॉर्डवर तयार केलेल्या या इपिक व्हिडीओमध्ये तसाच लाईटहाऊस दाखवण्यात आलाय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : क्या बात है! स्कायडायव्हिंग करताना उंच आकाशातून आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : लग्नात वहिनीने दीरासोबत केला इतका जबरदस्त डान्स की, नवरी पाहातच राहिली…

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, ३७ वर्षीय जर्मन सर्फर मिस्टर स्टुडटनरने आपले संपूर्ण आयुष्य लाटांचा पाठलाग करण्यात घालवले आहे. तो फक्त १३ वर्षांचा असताना त्याने हवाईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयासाठी त्याने पालकांना पटवून देण्यासाठी तीन वर्षे लागली, परंतु वयाच्या १६ व्या वर्षी त्याने सर्फिंगमध्ये करिअर करण्यासाठी सर्फर्सच्या नंदनवनात जर्मनीला एकटं जाण्याचा निर्णय घेतला.

मिस्टर स्टुडटनर यांनी पुढे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला सांगितले की, त्याच्यासाठी हा रेकॉर्ड यशस्वी करून दाखवणं हे सोपं नव्हतं. त्याच्या या निर्णयाला अनेक लोकांनी सपोर्ट केला नव्हता. त्याच्या धाडसी निर्णयामुळे तो आता जगातील सर्वात प्रसिद्ध सर्फर्सपैकी एक बनला आहे. त्याच्या नावाखाली आता हा रेकॉर्ड जिंकलेल्या विजयी व्यक्तींची एक लांबलचक यादी आहे आणि आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे टालटल बनला आहे.