Viral video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी वाघ, सिंह, बिबट्यासुद्धा जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं.
एक जिराफ शांतपणे पाणी पित होतं. तेवढ्यात एका सिंहानं त्याच्यावर जोरदार हल्ला केला. सिंह पूर्ण ताकदीने जिराफावर तुटून पडला. अशा वेळी जिराफानं असं डोकं लावलंय की तुम्हीही पाहून थक्क व्हाल..
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका नदीकाठी एक जिराफ शांततेने पाणी पित आहे. आसपास एकही प्राणी नाही. पण याच वेळी अचानक एका बाजूने जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची एन्ट्री होते. सिंह वेगाने जिराफच्या दिशेने धावत येत असतो, याची चाहूल लागताच जिराफ जोरात पळत सुटतो. सिंह अगदी त्याच्या जवळ पोहोचेला असतो. त्याच्या पायाला पकडून चावा घेणार इतक्यात पळता पळता जिराफ आपल्या पायाने सिंहाच्या थोबाडावर लाथ मारतो आणि तिथून पळून जातो. यानंतर सिंह जागीच थांबून जिराफला जाताना बघत राहतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सिंहानं पोटाची आग विझवण्यासाठी जिराफवर झडप मारली. पण सिंहाचं दुदैव म्हणजे जिराफनं मोठ्या हुशारीनं सिंहाचा वार चुकवला.
पाहा व्हिडीओ
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @natureismetal या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर देत आहेत. एकानं म्हंटलंय, “म्हणून कुणालाच कमी समजू नका”
