Girl Riding Hands Free Scooter On Road : वाहतूक पोलिस वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी आणि लोकांना जागरुक करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवत असतात. जेणेकरून लोक गाडी चालवताना स्वत:सह इतरांच्या सुरक्षेची काळजी घेऊ शकतील. तरीही अनेक बेशिस्त वाहनचालक वाहन नियमांचे उल्लंघन करतात. नुकताच सोशल मीडियावर एका स्टंट करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्ती आहे.

स्कुटीवर स्टंट करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तरुणीची स्कूटर चालवण्याची स्टाईल पाहून काहीजण हसत आहेत तर काही जण राग व्यक्त करत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी हेल्मेटशिवाय मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर दोन्ही हात मागे सोडून स्कूटर चालवताना दिसत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे अवघ्या १८ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १२ लाख लोकांनी पाहिला आहे.

हेही वाचा – धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

नेटकऱ्यांनी स्टंट करणाऱ्या तरुणींवर केली टीका

हा व्हिडीओ पाहणाऱ्या काही लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी तरुणीचा वेगवान स्कूटी चालवताना संतुलन आणि नियंत्रण पाहून काही लोक तिचे कौतूक करत आहेत. व्हिडीओमध्ये ही मुलगी रस्त्यावरून तिची स्कूटर भरधाव वेगात हात सोडून चालवताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, मागून येणाऱ्या एका कारस्वाराने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

व्हिडिओ पाहणाऱ्या काही लोकांनी तरुणीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. व्हिडिओ पाहणाऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘तुम्ही अनेक लोकांचे जीव धोक्यात टाकले आहेत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘बघा भाऊ, विग घातलेला कोणी मुलगा आहे का?’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘दीदी रॉक, सगळे शॉक.’