Viral Video : वाहतूक नियम मोडणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका अधिकाऱ्याची कार रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येताना दिसत आहे. जेव्हा या कारला समोरून येणारी कार थांबवते तेव्हा अधिकाऱ्याच्या कारमधून एक व्यक्ती बाहेर पडते आणि समोरून कार घेऊन येणाऱ्या व्यक्तीबरोबर वाद घालताना दिसते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका अधिकाऱ्याची कार रस्त्याच्या चुकीच्या बाजूने येताना दिसत आहे. जेव्हा समोरून येणारी व्यक्ती या कारला थांबवते, तेव्हा अधिकाऱ्याच्या कारमधून एक माणूस बाहेर पडतो. त्याला राग अनावर होतो आणि पुढे तो गाडीतून बाहेर पडून समोरच्या व्यक्तीबरोबर वाद घालताना दिसतो. समोरची व्यक्ती त्याला वारंवार म्हणते, “तुम्ही पोलिसांना बोलवा पण आम्ही बाजूला होणार नाही कारण तुम्ही रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवत आहात.” त्यावर तो माणूस म्हणतो, “तुम्हाला गाडीवरचा बोर्ड दिसत नाही का?” त्यावर व्यक्ती म्हणते, “गाडीवर बोर्ड लावला म्हणजे तुम्हाला रस्त्याच्या चुकीच्या बाजूने चालवण्याचा अधिकार नाही” त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलाच वाद रंगतो. शेवटी तो माणूस परत अधिकाऱ्याच्या गाडीत बसतो आणि त्या कार समोरून स्वत:ची कार हटवतो आणि परत रस्त्याच्या चुकीच्या बाजूने निघून जातो. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Mumbai, Foreign National, Cocaine filled Capsules, Mumbai airport, Foreign National Arrested, Foreign National Arrested at Mumbai Airport, Foreign National arrested with cocaine, cocaine of rs 10 crore,
मुंबई : अमली पदार्थांची तस्करी प्रकरणी परदेशी व्यक्तीला अटक, पोटातून बाहेर काढल्या १० कोटीच्या कोकेनच्या ११० कॅप्सूल
bombay hc terminates lease of salt pan land
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा, भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्याची मागणी फेटाळली
health of citizens is in danger Defeat ban order of municipality on wrapping food items in waste paper
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! रद्दी कागदात खाद्यापदार्थ बांधून देण्यावरील पालिकेच्या बंदी आदेशास हरताळ
Drunk Girls Viral Video
दारूच्या नशेत कपडे उतरवत रस्त्याच्या मधोमध तरुणीचा धिंगाणा, पोलिसांनाही वाटली लाज, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
rbi lifts bajaj finance restrictions on digital loan disbursement
बजाज फायनान्सच्या डिजिटल कर्ज वितरणावरील निर्बंध मागे
Gokhale bridge, beam,
गोखले पुलाच्या जोडणीला विलंब, तुळईच्या सुट्या भागांना उशीर, कंत्राटदाराकडून खुलासा मागवणार
rod attack on st bus conductor marathi news
बारामतीमध्ये महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता नागपुरात एसटी वाहकावर रॉडने हल्ला…
Former Zimbabwean cricketer Guy Whittle
Guy Whittall : धक्कादायक! माजी क्रिकेटरवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला, कुत्र्याने वाचवला जीव, रक्ताने माखलेला फोटो व्हायरल


काही लोकांना हा माणूस सरकारी अधिकारी आहे का, असा प्रश्न पडला असेल. अधिकाऱ्याची कार चालवणारा व्यक्ती खरंच अधिकारी आहे की ड्रायव्हर, या विषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा : Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

Pagan या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहेत.अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पावरचा दुरुपयोग करतोय” तर एका युजरने लिहिलेय, “अधिकाऱ्याला निलंबित करायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा माणूस कार चालवत आहे आणि त्याच्या अॅटिट्यूड वरून तो अधिकारी असू शकत नाही”