निसर्गात एकापेक्षा एक आश्चर्य दडलेली आहेत. सागरीजीवसृष्टीबद्दल तर आजही अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. एक सागरीजीव तर विना ऑक्सिजन जगतो. तर काही जीव हे पाण्यासारखे पारदर्शी आहेत. असे प्राणी देखील आपल्या पृथ्वीचा एक भाग आहेत यावर लोकांचा विश्वास नाही. सध्या ट्विटरवर अशाच एका अनोख्या ऑक्टोपसच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा ऑक्टोपस अगदी काचेसारखा पारदर्शक दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, तो प्रशांत महासागराच्या एका दुर्गम भागात पोहताना दिसला.

तुम्ही पारदर्शक माशाबद्दल ऐकले असेल, जो पाण्यातून बाहेर पडताच पारदर्शक होतो आणि पाण्यात शिरताच तो काळा होतो. पण यावेळी एका दुर्मिळ पारदर्शक ऑक्टोपसचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जो याआधी लोकांनी कधीच पाहिला नव्हता. काचेसारखे शरीर असलेल्या या ऑक्टोपसला पाहून लोक थक्क होत आहेत. त्याचे अंतर्गत अवयव उघड्या डोळ्यांनी कोणीही पाहू शकतो. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला ऑक्टोपसचे डोळे, नसा आणि फूड पाईप अगदी स्पष्ट दिसत आहेत, तर बाकीचे अवयव निळ्या रंगाच्या काचेसारखे दिसतात.

याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सुंदर ऑक्टोपसचा व्हिडीओ एका रोबोटने समुद्राच्या खोल पाण्यात बुडवून तयार केला आहे. आता तो सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर @TheOxygenProj या हँडलवरून शेअर केला आहे. “हा काचेचा ऑक्टोपस आहे, जो जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय पाण्यात आढळणारा एक अतिशय अनोखा प्राणी आहे. काचेचे ऑक्टोपस खोल समुद्रात आढळतात, जेथे सूर्यप्रकाश देखील पोहोचत नाही.” असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

आणखी वाचा : याला म्हणतात टीम वर्क! हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बापरे! महिला वेटरने एकाच वेळी हातात १२ बियर मग पकडून आणले!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून याला आतापर्यंत १८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.