सोशल मीडियावर दररोज प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र, कधी प्राण्याचे असे काही व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर बघायला मिळतात की, ते व्हिडीओ बघितल्यावर आश्चर्यच वाटते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. संकट प्रसंगी ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ असं संत तुकाराम महाराज यांनी सांगितलं होतं. या वचनाचा प्रत्यक्षात अनुभव देणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओ एक बकरी आणि गाढव दिसत आहे. हा व्हिडीओ अत्यंत मजेदार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिसतं की, एका गाढवाच्या पाठीवर चक्क बकरी बसली आहे. बकरी गाढवाच्या पाठिवर चांगली धरून बसली आहे आणि हे दोघे मस्त एका झाडाखाली उभे आहेत. गाढवाच्या पाठीवर उभी राहून ही बकरी झा़डाची पान खाऊ लागते. या बकरीपासून झाडाची पाने खूपच उंचावर होत्या. या बकरीला भूक लागली असावी, पण तिला झाडाच्या पानापर्यंत पोहोचता येत नव्हते. शेवटी तिने गाढवाची मदत घेतली आणि त्याच्या पाठीवर चढली. गाढव सुद्धा या बकरीला आपल्या पाठीवर घेत छान उभा असल्याचं दिसून येत आहे. गाढवाच्या पाठीवर उभी राहून ही बकरी झाडाची पाने खाताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : अशी कॉपी कोण करतं? विद्यार्थ्याचा जुगाड पाहून शिक्षकही झाले हैराण

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून लोक बकरी आणि गाढवाच्या मैत्रीचं कौतुक करताना दिसून येत आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप मजेदार वाटतोय. आपल्या अन्नासाठी बकरीने केलेला हा जुगाड पाहून लोक हैराण होऊ लागले आहेत.

आणखी वाचा : बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि समुद्रावर घिरट्या घालू लागला, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘टीमवर्क’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. मैत्रीला बंधन नसतं. ती कधीही कोणाशीही होऊ शकते असं म्हणतात. याचे दाखले आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहातो. या ठिकाणी आपल्याला माणसांचीच नव्हे तर प्राण्यांची मैत्री देखील पाहायला मिळते. या व्हिडीओला लोकांची इतकी पसंती मिळतेय की आतापर्यंत या व्हिडीओला ७८ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

आणखी वाचा : “पप्पा आमच्यासाठी काम करतात, ते जेवणही करत नाहीत,” या चिमुकलीचा भावूक VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : क्रेनसमोर अचानक एक महाकाय हत्ती आला, मग गजराजाने पुढे काय केलं, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर लोक आपल्या वेगवेगळ्या कमेंट्स देखील शेअर करताना दिसून येत आहेत. एका युजरने लिहिलंय ‘ही खरी मैत्री होय’. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘मित्रच मित्रांच्या संकटकाळी धावून येतात.’ काही युजर्सनी तर बकरी आणि गाढवामधील सामंजस्याचं कौतुक केलंय. आणखी एका यूजरनं लिहिलं, की अशी दृश्य फार कमी पाहायला मिळतात. त्यामुळे, लोकांसमोर येताच हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.