वर्ष संपायला अवघा दीड एक महिन्याचा अवधी उरला आहे. येणाऱ्या नव्या वर्षांत समोर काय वाढून ठेवलंय हे माहिती नाही. येणारं वर्ष कसं असेल? हे आपल्याला माहिती नसलं तरी २०१८ मध्ये एक गोष्ट कर्मचाऱ्यांच्या मनाजोगी घडणार आहे ती म्हणजे अशी की पुढच्यावर्षीही कर्मचाऱ्यांना मोठ्या सुट्ट्यांचा आनंद अनुभवता येणार आहे, त्यामुळे या नवीन वर्षांत तुम्ही जर कुठे लांब फिरायला जायचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी हे नवं वर्ष चांगलेच फायद्याचे ठरणार आहे. कारण २०१८ मध्ये एक दोन नाही तर किमान १० मोठे विकेंड कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना शनिवार, रविवार सुट्ट्या आहे त्यांना १२ महिन्यांतून किमान १० वेळा तरी सलग तीन ते चार दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येणार आहे.

Viral Video : ‘या’ तरुणाच्या हिंमतीची दाद दिलीच पाहिजे

जानेवारी
– २२ जानेवारी सोमवार – वसंत पंचमी
(२० आणि २१ जानेवारीला शनिवार, रविवार असल्याने कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी मिळणार आहे.)
– २६ जानेवारी शुक्रवार – प्रजासत्ताक दिन
(२७ आणि २८ जानेवारीला शनिवार, रविवार असल्याने कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी मिळणार आहे.)
मार्च
१ मार्च गुरूवार – होळी
२ मार्च शुक्रवार – धुलीवंदन
(३ आणि ४ मार्च शनिवार, रविवार असल्याने कर्मचाऱ्यांना सलग ४ दिवस सुट्टी मिळणार आहे.)
२९ मार्च गुरूवार – महावीर जयंती
३० मार्च शुक्रवार – गुड फ्रायडे
(३१ मार्च आणि १ एप्रिलला शनिवार, रविवार असल्याने कर्मचाऱ्यांना सलग ४ दिवस सुट्टी मिळणार आहे.)
एप्रिल
३० एप्रिल सोमवार – बुद्ध पौर्णिमा
१ मे मंगळवार – कामगार दिन
(ज्यांना शनिवार, रविवार सुट्टी आहे त्यांना सलग चार दिवस सुट्ट्यांचा आनंद)

या ब्रँडच्या सेकंडहँड कारची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक!

जून
१५ जून शुक्रवार – ईद
(शनिवार, रविवार सुट्टी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी मिळणार आहे.)
ऑगस्ट
२२ ऑगस्ट बुधवार – बकर-ईद
२४ ऑगस्ट शुक्रवार – ओणम
२६ ऑगस्ट रविवार – रक्षाबंधन
(कर्मचाऱ्यांना ३ दिवस सुट्टी मिळणार)
सप्टेंबर
३ सप्टेंबर सोमवार – जन्माष्टमी
(आधी शुक्रवार, शनिवार असल्याने पुन्हा सलग ३ दिवस सुट्टी )
१३ सप्टेंबर गुरूवार – गणेश चतुर्थी
(गुरूवारपासून सलग ४ दिवसांची सुट्टी )
ऑक्टोबर
१८ ऑक्टोबर गुरूवार – राम नवमी
१९ ऑक्टोबर शुक्रवार – दसरा
(२०, २१ ऑक्टोबरला शनिवार, रविवार असल्याने कर्मचाऱ्यांना सलग ४ दिवस सुट्टी मिळणार आहे.)
नोव्हेंबर
५ नोव्हेंबर सोमवार – धनत्रयोदशी
(शनिवार, रविवार सलग ३ दिवस सुट्टी)
७ नोव्हेंबर बुधवार – दिवाळी
८ नोव्हेंबर गुरूवार – पाडवा
९ नोव्हेंबर शुक्रवार – भाऊबीज
१० नोव्हेंबर शनिवार
११नोव्हेंबर रविवार
(सलग ५ दिवस सुट्टी )

कामाचे नियोजन ठरवण्यासाठी काही जण कँलेंडर उघडतात पण असेही काही जण असतात जे केवळ आणि केवळ सुट्ट्यांची यादी पाहण्यासाठी कँलेंडरची पान पलटत असतात. अशा सगळ्यांसाठी ही नक्कीच आनंद वार्ता आहे. नाही का?