scorecardresearch

Premium

Happy Birthday Google : ‘माहितीच्या बादशहा’ची २० वर्षे पूर्ण

प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा साऱ्यांचा मित्र गुगल आज २० वर्षांचा झाला आहे.

Happy Birthday Google : ‘माहितीच्या बादशहा’ची २० वर्षे पूर्ण

सर्वज्ञ अशा गुगलचा आज वाढदिवस. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा साऱ्यांचा मित्र गुगल आज २० वर्षांचा झाला आहे. या निमित्ताने गूगलने एक खास डूडल तयार केलं आहे.

१९९८ साली गूगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर १७व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गूगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्यानुसार हिशोबाने आज गूगलचा २०वा वाढदिवस आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गूगलकडे पाहिले जाते.

१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गूगल’ असे नाव ठेवण्यात आले. २००२ साली गूगलने पहिल्यांदा डूडल तयार केले. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गूगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करते. गूगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ इथे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. सुरुवातीला फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील, अशी गुगलची कार्यप्रणाली होती. मात्र, या कंपनीने या विचारात बदल करुन असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आणि त्यावरूनच सुरूवात झाली ‘एका क्लिकवर सर्व काही’ या संकल्पनेची.

भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. गुगलने मागील २० वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे. माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतला असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google completes successful 20 years with doodle

First published on: 27-09-2018 at 02:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×