गुगलने आज डुडल बनवत जगप्रसिद्ध फ्रेंच नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांना अनोखी आदरांजली वाहिली. आता फर्डिनान्ड यांचे काम खूपच मोलाचे होते म्हणूनच दृष्टी देणाऱ्या फर्डिनान्ड यांच्याबद्दल अनेकांना माहिती असलीच पाहिजे. आपण अनेकदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातो. तेव्हा वर एक पाटी टांगलेली असते, त्या पाटीवर लहान, मोठी, मध्यम आकाराची अक्षरं लिहिलेली असतात. त्या पाटीवरची अक्षरं डॉक्टर वाचून दाखवायला सांगतो, बरोबर ना? तर ही पाटी किंवा तक्ता मोनोयर यांनी तयार केला. हा तक्ता ‘मोनोयर चार्ट’ या नावाने ओळखला जातो. त्यांचा जन्म ९ मे १८३६ मध्ये झाला. आज त्यांचा १८१ वी जयंती तेव्हा खास डुडल बनवत गुगलने त्यांना आदरांजली वाहिली.
फर्डिनान्ड यांनी बनवलेला डायोप्टर आज जगभरातले नेत्रविशारद वापरतात. तेव्हा दृष्टी तपासण्यासाठी याचा मोठा फायदा डॉक्टरांना होतो. या डायोप्टरमुळे अचूक दृष्टीक्षमता ओळखता येते. विशेष म्हणजे डायोप्टरचा तक्ता बनवताना त्यातील अक्षरांची रचना त्यांनी आपल्या नावाच्या स्पेलिंगप्रमाणे केली होती. तेव्हा नीट निरखून पाहिले तर हा तक्ता पाहताना तुम्हाला त्यात फर्डिनान्ड मोनोयर यांच्या नावाची स्पेलिंग दिसेल. आता पुढच्यावेळी तुम्ही कधी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाल तेव्हा तक्ता बघताना त्यांचे नाव कुठे दिसतेय का हे शोधायला विसरू नका, तेवढीच छोटीशी गंमत