scorecardresearch

VIRAL VIDEO : नवरदेवाने नवरीऐवजी चक्क सासूच्याच गळ्यात टाकली वरमाला, वऱ्हाडी मंडळी बघतच राहिले

नवरदेवाची करामत पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने भर लग्नात सासूसोबत काय केलं हे एकदा पाहाच.

Groom-Funny-Video
(Photo: Instagram/ _.chutiyapa._)

लग्नातील अनेक मजेदार व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर दररोज पहायला मिळतात. असे व्हिडीओ शेअर होतात काही मिनिटांत व्हायरल देखील होतात. या व्हिडीओंमध्ये नवरा-नवरीचे सर्वात मजेदार व्हिडीओ असतात. नवरा-नवरीची फजिती झालेले तसेच नवरा-नवरीमधील जुगलबंदीचे अनेक मजेदार व्हिडीओ लोकांना खूप हसवतात आणि लोकांना ते बघायलाही आवडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवरदेवाची करामत पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये नवरदेवाने भर लग्नात सासूसोबत काय केलं हे एकदा पाहाच.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव दारू पिऊन इतका टल्ली झालेला दिसत आहे. तो इतका दारू प्यायलाय की त्याला धड उभाही राहता येत नाहीय. तो स्वतःच्याच लग्नात इतकी दारू प्यायलाय की जणू तो मित्राच्या लग्नात आहे. दारू पिऊन त्याची अवस्था खूपच वाईट झालेली दिसत आहे.

आणखी वाचा : वरात येताच लोक विचारू लागले, “मासे खाणार की गोळी?” मग काय झालं पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेव नवरीसमोर उभा आहे आणि सोबत नवरीची आई देखील उभी आहे. हातात हार घेऊन नवरदेव नवरीसमोर उभा आहे. नातेवाईक त्याला त्या स्थितीतही कसंबसं उभं करुन नवरीला वरमाला घालण्यास सांगतात. मात्र, त्याचं दारुमध्ये इतकं भान हरपलेलं असतं की तो वरमाला घालतना भलतीकडेच पाहतो. वरमाला नवरीच्या गळ्यात टाकताना थेट तिच्या बाजुला उभ्या असलेल्या सासूच्या गळ्याता टाकायला जातो. ते लक्षात येताच उपस्थित त्याला नवरीच्या गळ्यात हार टाकायला लावतात. त्यावेळी तो कसा बसा पुन्हा हार घालायला हात पुढे करतो मात्र नशेमुळे तो हार घालण्याआधीच खाली खुर्चीवर पडतो.

आणखी वाचा : वीज कोसळताना कधी पाहिली का?, थरारक दृश्याचा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जैसे कर्म तैसे फळ..! गाडी वेगाने पळवण्यासाठी म्हशीला चाबकाने मारत होता आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ कुणाचा आहे आणि नेमका कुठला आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. .chutiyapa. नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर झळकू लागला. लोक हा व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट करत आहेत. तसेच दारुचं व्यसन असणाऱ्यांची मस्करी करत आहेत. दारुचं समर्थन करणाऱ्यांनाही या व्हिडीओवरुन चिमटे काढले जात आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom accidentally put garland on his mother in law instead of the bride then this happened on the stage watch viral video prp