scorecardresearch

नवरीने वरमाळा घालताना केली चूक, वराला आला राग आणि मग…; video viral

तुम्ही आत्तापर्यंत बॉलीवूड चित्रपटांमध्ये फेरी टेल वेडिंग पाहिलं असेल, परंतु वास्तविक जीवन चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे.

Indian wedding viral video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: DPA Tech Info / Youtube)

Viral Video: लग्न ही एक अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये सगळं कुटुंब एकत्र येत. घरातील वातावरण अतिशय प्रसन्न असतं. तुम्ही आत्तापर्यंत बॉलीवूड चित्रपटांमध्ये फेयरी टेल वेडिंग पाहिलं असेल, परंतु वास्तविक जीवन चित्रपटांपेक्षा खूप वेगळं आहे. चित्रपटांचा खऱ्या आयुष्यातील लग्नाशी काहीही संबंध नाही. चित्रपटांच्या लग्नात, वराला आपल्या नवरीचे लाड करताना तुम्ही पाहिलेच असेल. पण तुम्ही कधी स्टेजवरच्या वराला छोट्याशा गोष्टीसाठी रागावताना पाहिले आहे का? नसेल तर असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्ही बघू शकता.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू तिच्या भावी पतीसोबत स्टेजवर घाबरून उभी आहे. स्टेजवर वरमाळा घालण्याचा कार्यक्रम होताना दिसत आहे. वधू प्रथम वराला फुलांचा हार घालते, परंतु ती वराच्या गळ्यात ती नीट हार घालू शकत नाही. हे पाहून वराला राग येतो आणि तोही क्षणार्धात वधूच्या गळ्यात हार घालतो. तो अशा प्रकारे हार घालतो की फुलांचा हार वधूच्या गळ्यातून खाली जातो.

(हे ही वाचा: वरातीमध्ये नवरदेवसोबत घोडीवर चढून ‘ही’ व्यक्ती करू लागली डान्स आणि पुढे…; video viral)

(हे ही वाचा: मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आईकडून पोलिसांनी करून घेतली मालिश, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हायरल व्हिडीओ लोकांना खूप आवडला असून त्यावर आपल्या नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओला ६.६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “वराने अखेर आपल्या अपमानाचा बदला घेतला आहे”. तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, “मी जरा वाकलो असतो भाऊ”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom gets angry on bride for not making him wear garland properly video viral ttg

ताज्या बातम्या