scorecardresearch

वरातीमध्ये नवरदेवसोबत घोडीवर चढून ‘ही’ व्यक्ती करू लागली डान्स आणि पुढे…; video viral

हा व्हिडीओ पाच लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे.

groom fell down from ghodi
मजेशीर व्हायरल व्हिडीओ (फोटो: Viral_ status1994 / Twitter

Viral Video: सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे, त्यामुळे लग्नाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ गंभीर स्वरूपाचे असतात तर काही मजेशीर असतात.नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल. हा व्हिडीओ यूट्यूबवर वारंवार पाहिला जात आहे. खरंतर, या व्हिडीओमधली वराचा डान्स आणि लग्नाची स्टाईल तुमचे मन जिंकेल.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वरातीमध्ये सगळेच मोठ्या आनंदात नाचताना दिसत आहेत. त्यातलीच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर उभे राहून नाचायला सुरुवात करते. यानंतर तो असा डान्स करतो की कोणाचा विश्वास बसणार नाही. तो वराच्या घोडीवर चक्क उभा राहून नाचू लागतो. तो माणूस अशा प्रकारे नाचतो की त्याच्यासोबत वरही घोडीवरून पडतो. त्याचवेळी आजूबाजूला उभे असलेले लोकही बघू लागतात. सध्या हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

(हे ही वाचा: मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आईकडून पोलिसांनी करून घेतली मालिश, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)

/

(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटीझन्स भन्नाट कमेंट करत आहेत, एका यूजरने लिहिले – “व्वा काय डान्स आहे की वरही सोबत पडला.”तर दुसरा लिहतो की, “मला हसू आवरता येत नाही.” हा व्हिडीओ पाच लाखाहून अधिक लोकांनी बघितला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Groom climbed on ghodi and danced on wedding day then fell down badly ttg