scorecardresearch

मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी आईकडून पोलिसांनी करून घेतली मालिश, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस अधिकाऱ्याला मसाज करत आहे तर दुसरी महिला त्याच्या समोर खुर्चीवर बसलेली आहे.

Sharsha-Viral-Video
धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल (फोटो: @UtkarshSingh_ / Twitter)

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्टनुसार, व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी आपल्या एक महिलेच्या मुलाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी तिच्याकडून जबरदस्तीने अर्धनग्न अवस्थेत मालिश करून घेत आहे. हे संपूर्ण प्रकरण बिहारमधील (Bihar) सहरसा जिल्ह्यातील आहे. जिथे नवहट्टा पोलीस ठाण्यात तैनात असलेले निरीक्षक शशिभूषण सिन्हा यांनी महिलेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याक्डून मालिश करून घेतली. एका खोलीत बेडवर बसून इन्स्पेक्टर मोबाईलवर बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस अधिकाऱ्याला मसाज करत आहे तर दुसरी महिला त्याच्या समोर खुर्चीवर बसलेली आहे.

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी फोनवर कोणाशी तरी बोलत आहे ज्यामध्ये तो म्हणत आहे की दोन महिला आधार कार्ड आणतील. खूप गरीब आहेत. माझाच १० हजार रुपये खर्च होत आहेत, त्यानंतर इन्स्पेक्टरने दोन्ही महिलांना सोमवारी येण्यास सांगितो.

(हे ही वाचा: उफ ये गर्मी! गाडीच्या बोनेटवरच महिलेने भाजली चपाती, व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

प्रकरणाचा तपास सुरु

हा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर लगेचच व्हायरल झाला. या संपूर्ण प्रकरणात कारवाई करत सहरसाचे एसपी लिपी सिंह यांनी आरोपी इन्स्पेक्टर शशिभूषण सिन्हा यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. यासोबतच आरोपी निरीक्षकाविरुद्ध एसडीपीओ दर्जाच्या अधिकाऱ्यांची टीम तयार करून तपास सुरू करण्यात आला आहे.

तत्काळ निलंबण

याप्रकरणी एसपी लिपी सिंह यांनी सांगितले की, व्हायरल व्हिडीओची सत्यता तपासण्यात आली आहे. एखाद्या महिलेकडून मसाज करून घेणे तिची अनुशासनहीनता आणि अहंकार दर्शवते. जे एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याच्या अगदी उलट आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची स्वत:हून दखल घेत त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

(हे ही वाचा: Video: वऱ्हाड घेऊन गेलेला नवरदेव एकटाच परतला; तर नवरीने केले दुसऱ्यासोबतच लग्न, कारण…)

बचावासाठी काय म्हणाले?

संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर इन्स्पेक्टर शशिभूषण सिन्हा यांनी आपल्या बचावात असा युक्तिवाद केला आहे की, “हा व्हिडीओ दोन महिन्यांचा आहे, महिलांना मसाज करणे गुन्हा नाही. ही घरची गोष्ट आहे आणि या गावच्या बायका आहेत.”

(हे ही वाचा: सासूने ओवाळून नववधूच्या डोक्यातच घातला नारळ; व्हिडीओ सोशल मीडियावर viral)

यापूर्वी, नवादा जिल्ह्याचे एसपी डीएस सावलाराम यांनी ट्रक चालकाकडून लाच घेतल्याप्रकरणी मुफसिल पोलिस स्टेशनचे स्टेशन हाउस ऑफिसर लाल बिहारी पासवान यांना निलंबित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पासवान ट्रक चालकाकडून लाच घेत असल्याचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: To get the son out of jail inspector got massaged from mother bihar video went viral ttg