अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा’ या सिनेमाने साऱ्यांनाच वेड लावलंय. पुष्पाचा फिवर अद्याप उतरलेला नाही. पुष्पा सिनेमातील ‘झुकेगा नहीं साला’ या डायलॉगची आजही चर्चा आहे. पुष्पाचा फिरवर एवढा जबरदस्त आहे की अगदी सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांना पुष्पाचा फिवर चढल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी खासदार उदयनराजेंनाही पुष्पाची भुरळ घातली होती. आता एका लग्नातील व्हिडीओ समोर आला आहे. लग्नात नवरदेवाने पुष्पा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी केली खरी, पण त्यावर लोकांनी देखील त्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलंय. याचा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

लग्नाच्या मंडपात चक्क नवरदेवानं पुष्पासारखा अभिनय करत त्याचा डायलॉग म्हटलं आहे. हा व्हिडिओ nehu22sa नावाच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यावर १.१ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव एकमेकांना हार घालताना दिसत आहे. इतक्यात अचानक नवरदेव हार घालण्यास नकार देतो आणि ‘पुष्पा’ चित्रपटातील डायलॉगबाजी करू लागतो. ‘मैं झुकेगा नहीं साला’ असा डायलॉग म्हणत तो सिग्नेचर स्टेप करू लागतो. आपल्या गळ्याखाली हात फिरवून तो हुबेहूब अभिनेता अल्लू अर्जूनसारखी स्टाईल मारू लागतो. पण त्याच्या या स्टाईलपुढे लोकांनी देखील डायलॉग बाजीमध्येच चांगलं उत्तर दिलंय.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या व्हिडीओवर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे की, ‘झुक जा भाऊ, अन्यथा आयुष्यभर झुकावं लागेल’. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिलं आहे की, ‘भाऊ, लग्नाच्या ३ महिन्यांनंतर मला भेटा’.

आणखी वाचा : स्वतःपेक्षा मोठा उंदीर पाहून मांजरीला धक्का बसला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : जिगरी दोस्त! पाहा घोडा आणि महिलेची ही अनोखी मैत्री, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो लगेच सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. एकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो वारंवार पाहिल्याशिवाय लोक राहत नाहीत. पुष्पा चित्रपटाचा फिवर आता लग्नसोहळ्यातही मोठ्या प्रमाणात चढताना दिसून येत आहे. लग्नसोहळ्यात पुष्पा स्टाईलमध्ये उखाणा घेत असल्याचे वेगवेगळे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होताना दिसून येत आहेत.