scorecardresearch

बापरे! एका रसगुल्ल्यावरून नवरदेव-नवरीने एकमेकांना धू-धू धुतलं; हा VIRAL VIDEO पाहून व्हाल शॉक

यात स्टेजवर उभ्या असलेल्या नवरी आणि नवरदेवाचं छोट्या गोष्टीवरून भांडण होतं आणि यानंतर दोघंही एकमेकांची धुलाई करू लागतात.

Bride-Groom-Video-Viral
(Photo: Instagram/ only._.sarcasm_)

सोशल मीडियावर विवाह, नवरदेव-नवरीशी संबंधित व्हिडीओ तुफान शेअर होतात. विशेष म्हणजे युजर्स असे व्हिडीओ मोठ्या चवीने पाहातात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कधी कधी लग्नाच्या दिवशीच अशा काही घटना घडतात, ज्यावर विश्वास बसत नाही. बहुतेकदा आपण लग्नाच्या दिवशी नवरी आणि नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसूच पाहतो आणि ते खूप आनंदी असतात. मात्र, काहीवेळा छोट्याशा चुकीमुळे गोंधळ निर्माण होतो. भारतात लग्नाचा सिझन सुरू झाला असून आता वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ समोर येऊ लागले आहेत. सध्या लग्नाच्या अशाच एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. यात स्टेजवर उभ्या असलेल्या नवरी आणि नवरदेवाचं छोट्या गोष्टीवरून भांडण होतं आणि यानंतर दोघंही एकमेकांची धुलाई करू लागतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभे असल्याचं पाहायला मिळतं. वरमाळाची विधी सुरू असतानाच या नवरी-नवरदेवामध्ये असं काहीतरी होतं त्यावरून दोघे लागोपाठ एकमेकांच्या कानशिलात लगावताना दिसून आले. हे दृश्य पाहून लग्न मंडपातील पाहूणे देखील हैराण होतात. नक्की असं या दोघांमध्ये काय घडलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झालीच असेल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरी नवरदेवाला रसगुल्ला खाऊ घालताना दिसून येतेय. पण याचवेळी नवरदेवाचं लक्ष भलतीकडेच असतं. जणू काही हा नवरदेव आपलं सगळं लक्ष कॅमेऱ्याकडेच फोकस करताना दिसून येतोय. आपला फोटो खराब येऊ नये याकडे नवरदेवाचं लक्ष असतं. पण यात नवरी भलतीच भडकली आणि वरमाळासाठी सजलेलं स्टेज कधी कुस्तीच्या मैदानात बदललं हे कळलंच नाही. नवरी नवरदेव दोघेही एकमेकांना लागोपाठ कानशिलात लगावताना दिसून येतात. हे दोघे नवरी नवरदेव एकमेकांना असे मारू लागतात की जणू काही त्यांची जन्मोजन्मीचं शत्रुत्व होतं. पहा हा मजेदार व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : खोदली कबर आणि निघाला जिवंत व्यक्ती…नातेवाईकांनी केलं होत दफन; हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

आणखी वाचा : नागिन डान्सनंतर आता मार्केटमध्ये आला ‘आर्मी’ डान्स, VIRAL VIDEO पाहून लोक थक्क

नवरा-नवरीच्या या जबरदस्त फाईटचा व्हिडीओ only._.sarcasm_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडीओला दीड हजारांपेक्षाही जास्त शेअरींग मिळालं आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्सचा वर्षाव सुरू केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी स्क्रिप्टेड असं सांगितलं आहे. तर काही लोकांनी नवरीच्या धाडसाला सलाम ठोकला आहे. नवरीने चांगलं उत्तर दिलंय, असं अनेक लोकांनी म्हटलंय. तर काही लोकांनी हा कॉमेडी व्हिडीओ असून तो खऱ्या लग्नातला नाही, असं सांगितलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gussail dulha dulhan ka viral video when bride and groom started slapping each other on jaimala stage prp

ताज्या बातम्या