वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर येत्या २६ जुलैपासून भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौऱ्याला सुरुवात करत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय मालिकेसह एक टि-२० सामना खेळणार आहे. पण हा दौरा सुरू होण्यापूर्वीच कॅप्टन विराट कोहलीनं मिळालेल्या फावल्या वेळात आपली हेअरस्टाईल बदलली आहे. विराट मैदानात जेवढ्या आक्रमक खेळीसाठी प्रसिद्ध आहे तेवढाच त्याच्या स्टाईलसाठीही तो प्रसिद्ध आहे. श्रीलंका दौऱ्याला निघण्यापूर्वी विराटने आपली हेअरस्टाईल बदलली आहे. बी-टाऊनमधला प्रसिद्ध सेलिब्रिटी हेअरस्टाईलिश अलिम हकिम याने विराटची कूल हेअरस्टाईल केलीय.
अलिमने इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराटचे नव्या हेअरस्टाईलमधले फोटो शेअर केलेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट प्रत्येक मोठ्या मालिकेपूर्वी आपल्या हेअरस्टाईलमध्ये बदल करत असल्याचे अनेकदा तुमच्या लक्षात आले असलेच. इंग्लडविरुद्धच्या मालिकेपूर्वी देखील विराटने आपली हेअरस्टाईल बदलली होती.