Happy Mothers Day 2025 Wishes In Marathi: जगभरात ‘मातृदिन’ म्हणजेच मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा होतो. हा दिवस म्हणजे आई आणि मातृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आईच्या प्रेमासाठी, त्यागासाठी आणि कुटुंबासाठी दिलेल्या योगदानासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. तसं पाहिलं तर आईसाठी एकही दिवस कधीच पुरेसा नसतो. ज्या व्यक्तीने आपल्याला ९ महिने ९ दिवस पोटात ठेवलं तिच्यासाठी एक दिवस कसा पुरेसा पडेल? पण तरीही ११ मे हा दिवस “जागतिक मातृ दिवस’ म्हणून साजरा केला जातो.आईसाठी ‘मदर्स डे’ ही ती संधी आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या आईसाठी काही वेळ काढू शकता आणि तिला खूप आनंद देईल असे काहीतरी करू शकता. तुम्हालाही हा मदर्स डे स्पेशल बनवायचा असेल तर तुमच्या आईला छान शब्दांत प्रेमाने मदर्स डे च्या शुभेच्छा द्यायला विसरू नका. हे मॅसेज तुम्ही स्टेटसला सुद्धा ठेवू शकता किंवा थेट तिला पाठव शकता. हे मेसेज वाचून तिच्याही डोळ्यांत नक्कीच आनंदाश्रू येतील.
‘ईश्वराचे रुप असते आई’; मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
मातृदिनाच्या शुभेच्छा..!
व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सांगण्याआधीच जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते
आईच्या पायीच तर स्वर्गाची प्राप्ती होते
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आई असेल सोबतीला तर विष सुद्धा अमृत होईल
आई नसेल सोबतीला तर सावलीत सुद्धा चटके देईल
हॅपी मदर्स डे..!

आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही जी हिशोब लावत नाही
ती धन्य माऊली म्हणजेच आई..!
हॅपी मदर्स डे मम्मा..!

तुझ्या चेहर्यावरील हास्य हे असेच राहू दे
आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ येऊ दे
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई …
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई…
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फिटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजवणं मिटणार नाही।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितीदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी।
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय
तू आहेस म्हणून मी आहे तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे.
गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला आहेसच तू मूर्तीमंत देवता…Happy Mothers Day