haridwar news before the daughters marriage the mother ran away with her boyfriend | Loksatta

घोर कलियुग! मुलीचं लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलं अन् आई प्रियकरासोबत पळाली, जाताना मुलीचे दागिनेही घेऊन गेली

फरार महिलेला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. यातीपैकी एका मुलीचं लग्न या महिन्यातील १४ तारखेला होतं

घोर कलियुग! मुलीचं लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलं अन् आई प्रियकरासोबत पळाली, जाताना मुलीचे दागिनेही घेऊन गेली
एका तरणीने लग्न ठरल्यानंतर आपल्या जुन्या प्रियकराच्या भीतीने पोलिस स्टेशन गाठलं आहे. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पोटच्या मुलीचं लग्न दहा दिवसांवर येऊन ठेपलं असताना एक आई तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुलीसह नातेवाईक प्रचंड चितेंत असून आईने केलेल्या या उद्योगामुळे मुलीचं लग्न तर मोडलं जाणार नाही ना? अशी काळजी सर्वांना लागून राहिली आहे. ही विचित्र घटना उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात घडली असून आजतक या हिंदी वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.

दहा दिवसांवर मुलीचं लग्न असल्याने नातेवाईकांसह घरातील मुलींनी लग्नाची जोरदार तयारी सुरूकेली होती. लग्नसोहळा असल्यामुळे कामांची घाई देखील सुरु होती. सगळे आपापल्या कामात असल्याचा फायदा घेत घरातील प्रमुख असणारी ३८ वर्षीय महिलाच प्रियकरासोबत पळून गेली, शिवाय मुलीसाठी लग्नात जे काही सोन्या-चांदीचे दागिने तयार केले होते ते देखील ही बाई घेऊन गेली आहे. त्यामुळे लग्न ठरलेल्या मुलीसह घरच्या मंडळींना चांगलाच धक्का बसला आहे.

हेही वाचा- बायकोच्या मृत्यूनंतर टॅक्सी चालकाने असं काही केलं की…, रात्रीत बनला करोडपती

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय महिलेच्या पतीचं एक वर्षापूर्वी निधन झालं आहे. या महिलेला एक मुलगा आणि तीन मुली आहेत. यातीपैकी एका मुलीचं लग्न याच महिन्यातील १४ तारखेला होतं. लग्नामुळे पाहुणेमंडळींचे घरी येणं जाणं सुरु झालं होतं. लग्नाची अशी एकंदरीत धामधून लुरु असतानाच शनिवारी रात्री नवरी मुलीची आई आपल्या चारही मुलांना सोडून चक्क आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.

हेही वाचा- Viral Video: अतिउत्साहात तरूणीसोबत डान्स करायला गेला आणि थेट स्टेजमध्ये घुसला

आई अचानक गायब झाल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. मात्र, सर्वांना मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा फरार झालेल्या महिलेने मुलीच्या लग्नासाठी आणलेले सर्व दागिने नेल्यांच समजलं. शिवाय फरार महिला आणि तिचा प्रियकर एकाच कंपनीमध्ये काम करत असल्याची माहिती देखील समोर आली असून त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं असल्याची शंका देखील पोलिसांना असून फरार महिला आणि तिच्या प्रियकराला शोधण्याचं काम सध्या सुरू केलं असल्याची माहिती मंगलौर कोतवालीचे एसएचओ राजीव रौथान यांनी दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:07 IST
Next Story
चोरांचा जीवाशी खेळ! बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून केली तेलाची चोरी; Viral व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का