Huge King Cobra Viral Video : साप पृथ्वीवरील सर्वात खतरनाक आणि घातक सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहेत. साप समोर दिसताच भल्या भल्यांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. छोटा साप जरी दिसला, तरी अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. मग किंग कोब्रा सारखा महाकाय साप जर तुमच्या समोर उभा राहिला, तर किती भयावह परिस्थिती निर्माण होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. अशाच प्रकारच्या एका मोठ्या किंग कोब्रा सापाचा धडकी भरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. आएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी जवळपास १८ फूट लांबीच्या किंग कोब्रा सापाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. जंगलात फिरतान एका खड्ड्यात ताड्याच्या झाडासारखा उभा असलेल्या या विशाल किंग कोब्राचे दृष्य कॅमेरात कैद झाले आहे.
सुसंता नंदा यांनी किंग कोब्राचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये म्हटलंय, किंग कोब्रासारखा साप सहज उभा राहू शकतो. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याची तीक्ष्ण नजरही किंग क्रोब्राकडे असते. एखाद्या गोष्टीचा सामना करायचा असल्यास हे साप शरीराचा १/3 भाग जमिनीवर उभा करु शकतात. एक मोठा किंग कोब्रा साप जंगलाच्या एका खड्ड्यात ताठ मानेने उभा राहिलेला व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून १.५ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “महाकाय किंग कोब्रा जंगलात उभा राहिलेला पाहून अनेकांचा थरकाप उडाला असेल.” दुसरा नेटकरी प्रतिक्रिया देत म्हणाला, या सापाला पाहून सर्वांनाच धडकी भरेल. “माझ्या समोर या सापानं अशा पद्धतीत उभं राहू नये. मी त्याच्या जंगलापासून खूप दूर आहे.” किंग कोब्रा जगातील सर्वात विषारी साप आहे. तसंच तो इतर सापांच्या तुलनेत खूप लांब असतो. किंग कोब्रा कमीत कमी १० फूट आणि जास्तीत जास्त २० फुटांचा असू शकतो. २० पाऊंड इतकं किंग कोब्राचं वजन असतं.