नुकतीच महाराष्ट्राच तळीये गावात दरड कोसळण्याची भीषण दुर्घटना घडली आहे. असाच एक दरड कोसळण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका डोंगराचा एक भागच कोसळल्यामुळे त्यात असलेला घाटाचा रस्ता पूर्णपणे होत्याचा नव्हता झाल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यातला असल्याचं समोर आलं आहे. काँग्रेस नेते बी. व्ही. श्रीनिवास यांनी देखील त्यांच्या ट्वीट अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्वीट केला असून त्यामधून काळजात धडकी भरवणारी दृश्य समोर आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या व्हिडीओमध्ये?

श्रीनिवास यांनी ट्वीटसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशच्या नाहन भागातला आहे. इथल्या बदवास या डोंगराळ परिसरामध्ये घाटाचा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, अचानक डोंगाराचा काही भाग खचल्यामुळे त्याखाली असणारा आख्खा घाटाचा रस्ताच घेऊन हा सगळा मलबा खाली कोसळला. क्षणार्धात हा रस्ता होत्याचा नव्हता झाला!

 

दरम्यान, या घटनेमध्ये जीवितहानी झाली किंवा नाही, याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. हा रस्ता खचल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील ७०७ हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

 

सरकारचा पर्यटकांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी २०४ पर्यटक अडकले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून त्यांना हवाई मार्गे परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, आत्तापर्यंत हिमाचल प्रदेशमध्ये पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal pradesh landslide viral video from nahan area road goes down pmw
First published on: 30-07-2021 at 17:13 IST