सध्या ‘चेनस्मोकर्स’ या डीजे जोडगोळीचा दबदबा आहे. त्यांच्या क्लोझर, डोंट लेट मी डाऊन, आणि ‘कबिरा’चं त्यांचं व्हर्जन तुफान लोकप्रिय ठरलंय. शहरांमध्ये कुठल्याही पबमध्ये किंवा कॅफेमध्ये ही गाणी सारखी लागलेली दिसतात. इंग्लिश म्युझिक चॅनल्सवर तर ही गाणी सतत लागलेली दिसतात. यंग क्राऊडमध्ये तर ही गाणी जाम फेमस आहेत. या सगळ्या धीम्या पण रोमँटिक गाण्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तरूणाईला आपलं प्रतिबिंब दिसतं. या गाण्यांच्या नावावरून ही गाणी कदाचित लक्षात येणार नाहीत पण त्यांची चाल कानावर पडली की ही गाणी कुठेतरी एेकल्यासारखी चटकन लक्षात येतात. पहा ‘क्लोझर’ या गाण्याचा व्हिडिओ
सौजन्य- यूट्यूब
पाहिलंत ओरिजनल गाणं? आता यापुढे हे प्रकरण पहा
याचंपण सौजन्य- यूट्यूब
सरहद पार करून अलीकडे असे अनेक ‘नग’मे आले आहेत. याआधी काही दिवस ताहेर शाह नावाचं वादळ पाकिस्तान पार करून भारतीय नेटयूझर्सच्या डोक्यावर आदळलं. ताहेर शाहच्या ‘एंजल’ गाण्यामुळे हा महात्मा जन्माला न येता डायरेक्ट अमर का झाला नाही अशी रास्त शंका कोट्यवधींना आली. भारत आणि पाकिस्तानचं या बाबीवर एकदम एकमत झालं. बघा ताहेर माऊलींचा प्रताप
हेही सौजन्य – यूट्यूब
या अत्याचाराला पुरून उरला असाल तर पुन्हा जाऊयात नासिर खानकडे. आपल्या गाण्याने सगळ्यांना नकोसं करणारा हा नासिर खान पाकिस्तानमधला आहे. आपल्या फॅन्ससाठी आपण हे गाणं म्हणत असल्याचं त्याने हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकताना म्हटलंय! त्या फेसबुक पेजवर १ लाखापेक्षा जास्त लाईक्स आहेत! हे लाईक्स त्याच्या फॅन्सपेक्षा ‘काय करतोय पाहुया’ या विचाराने हसून बेजार झालेल्यांचे हे लाईक्स वाटत आहेत…
नासिरच्या ‘गायकी’मुळे ‘ट्विटर’ फुटलं.
Nasir Khan Jan’s closer just got me closer to death.
— Vishakha Joshi (@vishakhaajoshi) February 10, 2017
तर या नासिर खानला पोलिसांनी एकाएकी अटक केली. त्याच्यावर जगभरातल्या कायदा पाळणाऱ्या नागरिकांची झोप उडवण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे की नाही हे अजून कळू शकलेलं नाही. पण त्यानेच ट्वीट करत आपल्याला अटक झाल्याची कबुली दिली आहे.
Police Arrested me for no reason wtf
Why you not arrest criminals?
Thnks a lot to @Ziddi_Says Zahreeli chummi page admin for my Bail.
— Nasir Khan Jan (@Jan1Nasir) February 8, 2017
ट्वीट काळजीपूर्वक वाचलं तर लक्षात येईल की नासिरला ‘जहरीली चुम्मी’या पेजचा अॅडमिन असलेल्या त्याच्या मित्राने जामिनाची व्यवस्था करून दिली.
नासिरला अटक वगैरे व्हावी अशी कोणाची इच्छा नाही. त्याने आपलं आयुष्य मुक्तपण जगावं, नव्या वाटा शोधाव्यात, खूप पुढे जावं. फक्त गाणं गाऊ नये! किती गोड पोरगं आहे पहा.

तर बाबांनो गायक व्हायचंय? कलाकार व्हायचंय? तर मग थोडा रियाझ करा. थोSSडी दया करा. आणि मगच या क्षेत्रात आदळण्याचा निर्णय घ्या.