Rose Farming : फुलांचा राजा समजला जाणारा गुलाब लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी तर गुलाब विशेष प्रसिद्ध आहे. तरुणाईंमध्ये सर्वात लोकप्रिय असलेल्या या गुलाबाची किंमत व्हॅलेंटाइन डे मुळे फेब्रुवारी महिन्यात आणखी वाढते. खरं तर गुलाबाला जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. तुम्ही कधी विचार केला का की गुलाबाची लागवड कशी केली जाते? आज आपण एका व्हायरल युट्यूबच्या व्हिडीओद्वारे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Smart Education या युट्यूब अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गुलाब लागवडीविषयी संपूर्ण माहिती सांगितली आहे. व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे – बाजारपेठेत एका फुलाला ८ ते १० रुपये भाव मिळतो. कमी दिवसांमध्ये आणि कमी कष्टांमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा एक चांगला पर्याय म्हणून तुम्ही गुलाब शेतीकडे बघू शकता. आपल्याकडे पुरेशी जमीन नसेल तर फक्त वीस ते तीस गुंठ्यामध्ये तुम्ही गुलाबाची शेती करून महिन्याला ५० ते ६० हजारपर्यंत उत्पन्न मिळवू शकता. त्यासाठी कोणत्याही पॉली हाऊसची गरज नाही.

Three Key Rules To Loose 6 Percent Fats In a Month
६ टक्के बॉडी फॅट्स एका महिन्यात कमी करण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी पाळाच; वजन कमी करण्यासाठी झोप व आहाराचे नियम पाहा
Ghatkopar incident
VIDEO : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, बचावकार्यात अडचणींचा डोंगर!
Ghatkopar hoarding collapse
मुंबई: दोन दिवसांपूर्वी गावी जाण्यासाठी तिकिट काढले; मात्र काळाने झडप घातल्याने गावी न्यावा लागणार मृतदेह
children at home
घरात लहान मुलं असतील तर ‘या’ चुका टाळा, अन्यथा अपघात अटळ!
Make Tasty Mango Jam at home
तुमच्या मुलांसाठी घरीच बनवा ‘आंब्याचा टेस्टी जाम’; पटकन नोट करा ‘ही’ सोपी रेसिपी
how to pick juicy lemons
Kitchen tips : लिंबू भरपूर रस देणारे आहे कि नाही, कसे ओळखावे? बाजारात जाण्याआधी या टिप्स पाहा
Sukha bombil rassa bhaji recipe in marathi
घरात भाजी नाहीये? टेन्शन घेऊ नका,आजीच्या पद्धतीने बनवा सातारा स्पेशल झणझणीत बोंबील रस्सा
control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

गुलाब कोणता लागवड करावा आणि कोणत्या महिन्यात लागवड करावा?

पॉलिहाऊस विना गुलाब शेती करता येणारा गुलाबाचा एक नवा प्रकार आला आहे. याला बोरडेक्स गुलाब म्हणतात. हा एक उत्तम पर्याय आहे. जुन आणि जुलै महिन्यात तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गुलाबाची लागवड केली जाते. अडीच बाय पाच फूट अंतरावर एक एकर मध्ये चार हजार रोपे तुम्ही लावू शकता आणि अर्धा एकरमध्ये दोन हजार झाडांची लागवड तुम्ही करू शकता.

गुलाब शेती साठी जमीन कशी असावी? या शेतीसाठी खर्च किती येईल?

गुलाब शेतीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे. एक गुलाबाचे झाड १२ रुपयांना आहे. २५ ते ३० हजार हा अर्धा एकरासाठी खर्च आहे. त्यानुसार तुम्ही लागवड करू शकता.

या व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गुलाब शेती लागवड, महिन्याला ५० ते ६० हजार रुपये कमवा; आपली शेती मराठी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना व्हिडीओ आवडला आहे. काही युजर्सनी याबाबत आणखी प्रश्न विचारलेली आहेत.