आपल्यापैकी बऱ्याच जणांना बाहेरच्या देशात काय सुरुय, तिकडे कोणत्या गोष्टी कशा असतात याचं कुतुहल असतं. म्हणजे जसं गाव खेड्यातील लोकांना शहराचं आकर्षण असतं अगदी तसंच. शहरातले लोक काय खातात इथपासून शहरात आभाळ कसं असतं इथपर्यंतचं कुतुहल लोकांना असतं. दरम्यान आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये भारतात आणि जर्मनीत भाज्या धुण्यामध्ये काय फरक असतो हे दाखवलं आहे. आता तुम्ही म्हणाल भाज्या काय वेगळ्या धुणार पण हा व्हिडीओ बघा मगच तुम्हाला कळेल.

जर्मनीत गृहिणी भाज्या कशा धुतात

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Bhastrika Pranayama
Bhastrika Pranayama VIDEO : स्वत:ला उत्साही ठेवण्यासाठी चहा किंवा कॉफी घेताय? त्यापेक्षा नियमित करा भस्त्रिका प्राणायाम
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

जर्मनीत राहणाऱ्या एका भारतीय महिलेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, यामध्ये या महिलेने भारतात आणि जर्मनीत भाज्या कशा वेगवेगळ्या पद्धतीनं धुतात हे सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपण वांगी धुताना कशी धुतो…तर आधी सगळी वांगी एका भांड्यात काढतो आणि मग त्यात पाणी टाकून भांड्यातच वांगी धुवून त्यातलं पाणी बेसीनमध्ये टाकून देतो. आता ही झाली भारतीय पद्धत. मात्र जर्मनीमधले लोक भाज्या वेगळ्या प्रकारे धुतात. तिथले लोक सर्वातआधी बेसीन लॉक करतात बेसीनमध्ये पाणी साठवतात आणि त्यात भाज्या टाकून धुतात. आता तुम्ही म्हणाल बेसीनमध्ये आपल्या भारतात खरकटं वगैरे असतं तर या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हे बेसीन स्वच्छ दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> धावत्या ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न नडला, पाय घसरुन फरफटत राहिला अन्…Video

हा व्हिडीओ dhanyateforeign या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तसेच जर्मनीत हे कंस असतं, ते कसं असतं असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात..सोशल मीडियामुळे देशाच्या कानाकोपऱ्यापासून इतर देशातल्याही छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचतात. त्यातलाच हा एक व्हिडीओ..