Vyom Electric Tractor: देशात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढताना दिसून येत आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना या वाढत्या किमतीचा काही फरक पडत नाही, पण याचा सर्वाधिक त्रास मध्यमवर्गीयांना सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढत्या किमतीपासून सुटका मिळवण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवला आहे. हा इलेक्ट्रीक ट्रॅक्टर फक्त ४ तासात पूर्ण चार्ज होतो आणि तब्बल १० तास काम करतो. हे वाचून तुम्हाला कदाचित यावर विश्वास बसणार नाही. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

गुजरातमधील एका शेतकऱ्याने बॅटरीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा शोध लावला आहे. यानंतर लोक त्या शेतकऱ्याला विचारत आहेत की, एवढ्या वजनदार ट्रॅक्टरमध्ये बॅटरी लावून त्याचा शेतीमध्ये कसा उपयोग होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. जामनगर येथील कलावद येथे राहणारे शेतकरी महेश भाई यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव ‘व्योम ट्रॅक्टर’ असे ठेवले आहे.

असा बनवला इलेक्ट्रिक ‘व्योम ट्रॅक्टर’
कलावद तालुक्यातील पिप्पर गावात राहणारे ३४ वर्षीय महेश भाई यांनी शेतीसाठी बॅटरीवर चालणारा व्योम ट्रॅक्टर बनवला आहे. महेशचे वडीलही व्यवसायाने शेतकरी असून ते घरातील शेतीची कामे करतात. शेतकरी महेश भाई यांनी बनवलेला व्योम ट्रॅक्टर २२ हॉर्स पॉवरचा आहे. यात 72 वॅटची लिथियम बॅटरी आहे. व्योम ट्रॅक्टरला पूर्ण चार्ज होण्यासाठी ४ तास लागतात. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर या ट्रॅक्टरची बॅटरी १० तास टिकते.

भारतातील सर्वात आधुनिक बॅटरीवर चालणारा हा ट्रॅक्टर म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही, मुकेश भाईंनी बनवलेल्या व्योम ट्रॅक्टरमध्ये बरीच फिचर्स आहेत. हा ट्रॅक्टर थेट मोबाईलवरूनही नियंत्रित करता येतो. तुम्ही मोबाइल गेमप्रमाणे ते नियंत्रित करू शकता. ट्रॅक्टर कधी वळवायचा, वेग कुठे ठेवायचा, हे सर्व मोबाईलद्वारे करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील सर्व शोरूममध्ये व्योम इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची विक्री सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, कारण वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. व्योम ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, हे मात्र नक्की आणि इंधनाचे पैसे देखील वाचणार आहेत.