तुम्ही कधी कॉलेजच्या ग्रंथालयाबाहेर पहाटे सहा वाजल्यापासून रांग लावली आहे का? पण चिनी विद्यार्थी मात्र ग्रंथालयात आपल्याला प्रवेश मिळावा म्हणून सकाळी सहा वाजल्यापासून ते ही कडाक्याच्या थंडीत रांग लावतात. याचे काही फोटो गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिक्षेचा काळ जवळ आला आहे. त्यामुळे या विद्यार्थांना अभ्यासासाठी लागणा-या महत्त्वाच्या विषयाच्या नोट्स ग्रंथालयात उपलब्ध असतात. यातली काही नोट्स विद्यार्थ्यांना घरी न्यायला बंदी आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना ग्रंथालयात जाऊन अभ्यास करण्यावाचून मुलांकडे दुसरा पर्याय नसतो.

Viral : कॉपीला आळा घालण्यासाठी चिनी शिक्षकांनी शोधला रामबाण उपाय

हँगझू डायझी विद्यापीठातील जवळपास १ हजार विद्यार्थ्यी परिक्षेला बसले आहेत. त्यांची परिक्षा जवळ आली आहे. त्यामुळे अभ्यासाच्या नोट्स मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाबाहेर लांबलचक रांगा लावल्या. चीनच्या एका वृत्तपत्रानुसार ग्रंथालयात प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी पहाटे सहा वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. विद्यापीठाचे ग्रंथालय हे सकाळी आठ वाजता उघडते. पण आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी आधीपासूनच रांगा लावल्यात. विद्यापीठ परिसरात काही किलोमीटरपर्यंत ही रांग गेली होती. या विद्यार्थ्यांना ग्रंथालयात प्रवेशासाठी तिकीट देखील दिले जाते.

Viral : प्रियकराच्या ‘बेवफाई’चे प्रेयसीने लावले गावभर पोस्टर

गेल्यावर्षी देखील असेच काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे सगळेच चकित झाले होते. कोणत्याही ग्रंथालयाबाहेर अशी रांग पाहायला मिळाली नसेल. त्यामुळे सोशल मीडियावर या फोटोंची चर्चा चांगलीच झाली होती. पण चिनी विद्यार्थांनी मात्र यावर आपली नाराजी व्यक्त केली. रांगेतच आपला मौल्यावान वेळ वाया जातो अशी तक्रार या विद्यार्थ्यांनी केली पण नोट्स गरजेच्या असल्यामुळे आपल्याला कोणताच पर्याय नसल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.