बिहारमधील बांका येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे येथील एका तरुणाने कष्ट करुन पैसे कमावले आणि त्याच्या पत्नीला एक महागडा मोबाईल गिफ्ट म्हणून दिला. मात्र, पत्नी नवीन मोबाईल मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशीच तीन मुलांना आणि नवऱ्याला सोडून तिच्या प्रियकरासह पळून गेली आहे. पत्नी पळून गेल्याचं समजताच नवऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, या तरुणाच्या पत्नीचा आत्तापर्यंत शोध लागला नाही. मात्र या महिलेचे एका पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय ती पती जवळ नसताना अनेकदा तिच्या प्रियकराला घरी बोलावयची असं शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बांका जिल्ह्यातील अमरपूर गावात घडली आहे. येथीस एका तरुणाने त्याची पत्नी घरातून पळून गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

हेही पाहा- दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीवर काळाचा घाला; पत्नीच्या डोळ्यांसमोर झाला मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

तक्रारीत त्याने सांगितलं, “मी नेपाळमध्ये मजूर म्हणून काम करतो, माझ्या पत्नीने मला अनेकदा नवीन मोबाईल घेऊन द्या, अशी मागणी केली होती. म्हणून मी नेपाळहून तिच्यासाठी एक महागडा मोबाईल गिफ्ट म्हणून आणला होता. मात्र, मी तिला मोबाईल दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती घरातून पळून गेली.” तसेच मी नेपाळमध्ये राहत असल्याने माझ्या पत्नीचे इतर कोणाशी अफेअर होतं, याबाबतची मला माहिती नव्हती असंही तो म्हणाला.

तीन मुलांना सोडून प्रियकराबरोबर गेली

पत्नी घरातून पळून गेल्यामुळे तरुणाला मोठा धक्का बसला, त्याने पोलिसांना पत्नीला शोधून घरी परत आणण्याची विनंती केली आहे. तो म्हणाला, मी मोबाईल देण्यासाठी नेपाळहून घरी आलो आणि पुन्हा कामासाठी नेपाळला गेलो. मी नेपाळला पोहोचल्यानंतर पत्नीने माझा फोन उचलणे बंद केलं. त्यानंतर मी एका शेजाऱ्याला फोन केला, यावेळी त्यांनी मला सांगितले की, माझी पत्नी तिच्या प्रियकराबरोबर घरातून पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला तिच्या तीन मुलांना घरात ठेवून ती पळून गेली आहे.

हेही वाचा- विवस्त्र केलं, चुंबन घेत Video काढला अन्.. IIT BHU मधील भयंकर घटना! तरुणीने सांगितलं १५ मिनिटांत काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित तरुणाने शेजाऱ्यांकडे पत्नी संबंधित माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, तुमच्या पत्नीचे अनेक दिवसांपासून एका पुरुषाशी प्रेमसंबंध सुरू होते. ती तिच्या प्रियकरासह फिरायची शिवाय तो पुरुषही कधी कधी घरी राहण्यासाठी यायचा. काही दिवसांपूर्वीच आम्ही तिला घरातील सामान घेऊन जाताना पाहिलं होतं, तेव्हापासून ती घरी परतली नाही. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितले.