सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच उखाण्यांचे अनेक व्हिडीओ खूप चर्चेत असतात. सहसा बायको नवऱ्यासाठी उखाणा घेते पण आता पुरुषमंडळीही एकापेक्षा एक भारी उखाणे बायकोसाठी घेत असतात. असाच एका नवरदेवाचा उखाणा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा उखाणा ऐकून तुम्हालाही पोट धरुन हसायला येईल.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे आणि या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरीसाठी उखाणा घेत आहे. नवरदेव उखाणा घेताना म्हणतो, “चांदीच्या शर्टला सोन्याचं बटण, चांदीच्या शर्टला सोन्याचं बटण..; शिवकन्या असली माळकरी तरी मी सोडणार नाही चिकण मटण”

हेही वाचा : भावांनो, रक्षाबंधननंतर काही दिवस तुम्हालाही हा त्रास होतो का? बहिणीने बांधलेली राखी जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल

नवरदेवाचा हा उखाणा ऐकून नवरीसह आजुबाजूला उभे असलेले सर्वजण जोरजोराने हसताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. नवरदेवाने उखाण्याच्या मदतीने आपण बायकोसाठी चिकण मटण सोडणार नसल्याचे स्पष्टच सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

marathi_weddingz या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजर्सनी लिहिलेय, “दादा तुला आमच्या कडून ५ किलो फ्री” तर एका युजर्सनी लिहिलेय, “एक नंबर नाव घेतलं भाऊ” आणखी एका युजर्सनी लिहिलेय, “भन्नाट उखाणा”