आदर्श नवरा कसा असतो? असा प्रश्न स्त्रीयांना विचारल्यास अनेक उत्तर मिळतील. प्रत्येकीच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्याने प्रत्येकीचे उत्तर वेगळे असू शकते. मात्र नवरा प्रेमळ, काळजी करणार आणि सन्मान देणारा असावा असं सर्वचजणी सांगतील. मात्र खरोखरच असा नवरा नशिबवान मुलींनाच मिळतो असंही महिला म्हणतात. पण एका महिला नवऱ्याच्या बाबतीत खूपच नशिबवान ठरली आहे. तिच्या नवऱ्याने केलेल्या एका कृतीमुळे हे दोघेही इंटरनेटवर चर्चा विषय ठरले आहेत.

अमेरिकेतील इंडियाना राज्यातील इव्हान्सविलेमध्ये राहाणाऱ्या ली जॉन्सन या व्यक्तीने ट्विटवर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक पुरुष विमानामध्ये उभा असलेले दिसत असून त्याच्यासमोरील दोन्ही सीटवर एक स्त्री झोपल्याचे दिसत आहे. ‘आपल्या पत्नीला शांत झोप घेता यावी म्हणून ही व्यक्ती मागील सहा तासांपासून विमानामध्ये उभी आहे,’ असं या फोटो कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले होते.

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पत्नीसाठी सहा तास उभ्या राहणाऱ्या या व्यक्तीचे कौतुक केले आहे. एकीकडे या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत असताना काही जणांनी स्वत:च्या झोपेसाठी पतीला सहा तास उभं करणाऱ्या पत्नीवर टीका केली आहे.

तिला असं करता आलं असत

रोझसारखी स्वार्थी

मी नसतं असं केलं

प्रेम नाही

बावळटपणा

मी एकटा राहिलो असतो

हे प्रेम

ती स्वार्थी तो दुबळा

प्रेम नाही त्रास

अयोग्य

रोज जॅक आणि बावळटपणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान नेटवर तरी दोन्ही बाजूकडील समर्थक आपली मते मांडत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी दे दांपत्य कोण होते याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. इतकच नाही तर अनेकांनी या फोटोच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. ते काहीही असलं तरी हा फोटो सध्या चर्चेत आहे हे मात्र खरं.