श्रद्धा वालकरच्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. आफताब पुनावालाने प्रेयसी श्रद्धाचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलातील विविध भागात फेकले. या प्रेमप्रकरणाच्या घटनेमुळं लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. परंतु, प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. पण खऱ्या प्रेमात (True Love) आंधळेपणा नसतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण फुटपाथवर निवांत बसलेल्या एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

पत्नीवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या पतीचा व्हिडीओ व्हायरल

एका रस्त्याच्या बाजूला एक जोडपं विश्रांतीसाठी बसलेलं असतं. पत्ती पतीच्या प्रेमात इतकी आकंठ बुडते की, तिला पतीच्या कुशीत गाढ झोप लागते. पत्नीला स्वप्नांच्या दुनियेत निवांत झोप येण्यासाठी पतीचं प्रेम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. पत्नी मांडीवर डोका ठेवून गाढ झोपेत आहे, त्याचदरम्यान पती तिला प्रेमाने जवळ घेतो. आपण रस्त्याच्या बाजूला बसलो आहोत, याचा जराही विचार न करता तो व्यक्ती पत्नीला शांत झोप मिळण्यासाठी तिला प्रेमाने कुरवाळतो.

आणखी वाचा – बर्फाच्या डोंगरात विश्वविक्रमाला गवसणी, 30000 km प्रवास अन् अंटार्कटिकात फूड डिलिव्हरी, भारताच्या तरुणीचा Video होतोय Viral

हेच आहे खरं प्रेम’, नेटकरी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पत्ती-पत्नीच्या अजब प्रेम की गजब कहाणीला एकाने कॅमेरात कैद केलं आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.सोशल मीडिया हॅंडल ट्विटरवर हा व्हिडीओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास ५२ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओला ४४८ रिट्विटं्सही मिळाले आहेत. ३१ सेकंदाच्या या व्हिडीओत पतीचा पत्नीसाठीचा असलेलं खरं प्रेम पाहता येईल.