Shocking video: राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्याचं बघायला मिळतंय. स्त्रियांवरील हिंसाचार ही अगदी रोजची बाब होऊन गेली आहे. महिला कुठेच सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. अदगी घरातली महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान अशीच एक विनयभंगाची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील रुचिका लोहिया नावाच्या एका महिलेने अलीकडेच इंस्टाग्रामवर दिल्लीच्या प्रवासादरम्यान कॅब ड्रायव्हर्सशी झालेल्या दोन अस्वस्थ करणाऱ्या घटना शेअर केल्या आहेत. तिने दोन्ही घटना – प्रत्येकी वेगळ्या राइड-हेलिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित – अत्यंत धक्कादायक असल्याचं सांगितलं आहे. ज्यामुळे संताप निर्माण झाला आणि दिल्लीत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली.

तिच्या पोस्टनुसार, पहिली घटना दिल्ली विमानतळावरून रॅपिडो राइड बुक केल्यानंतर घडली. तिने ड्रायव्हरला एअर कंडिशनिंग चालू करण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला आणि तिला सांगितले, “माझ्या इच्छेनुसार ते चालू केले जाईल. जर तुम्हाला एसीची इतकीच गरज असेल तर दुसरी कॅब बुक करा.” नंतर तिने विमानतळावरील रॅपिडोच्या मदत केंद्राशी संपर्क साधला. परंतु तिने अखेर नोएडाला पोहोचण्यासाठी उबर बुक करण्याचा निर्णय घेतला.

नेमकं काय घडलं?

उबर प्रवासादरम्यान, तरुणीची थोड्या वेळासाठी झोप लागली आणि ज्यावेळी तिला जाग आली तेव्हा तिला जे समोर दिसलं ते पाहून तिला धक्का बसला. ड्रायव्हर तिचा व्हिडीओ रेकॉर्ड करत असल्याचे तिने पाहिले. मात्र सुरुवातीला तिला भास झाल्यासारख वाटलं. मात्र काही क्षणांनंतर, तिला समजले की तो प्रत्यक्षात तिचे रेकॉर्डिंग करत आहे. घाबरून, तिने पटकन तिच्या बहिणीला माहिती दिली आणि कॅबची माहिती शेअर केली. तिच्या बहिणीने तिला ताबडतोब गाडीतून उतरण्यास सांगितले. यानंतर तरुणीने डोकं लावलं आणि रस्त्यात आलेल्या मैत्रिणीला काहीतरी द्यायचे आहे असे भासवून, सुश्री लोहिया तिची सुटकेस घेऊन बाहेर पडली आणि तिथून पळून गेली.

पाहा व्हिडीओ

दोन्ही कंपन्यांकडून प्रतिसाद

या व्हिडिओला आधीच दोन दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत आणि दोन्ही कंपन्यांकडून त्याला प्रतिसाद मिळाला आहे. रॅपिडोने माफी मागितली आहे की, “तुमच्या अलीकडील राईडमध्ये झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ही सेवा आम्ही देऊ इच्छित नाही. कृपया तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि राईड आयडी डीएम द्वारे शेअर करा जेणेकरून आम्ही तुम्हाला अधिक मदत करू शकू.”
उबरनेही या घटनेवर भाष्य केले आहे, “हाय रुचिका, हे ऐकून खूप चिंता वाटते. उबर प्रवाशांच्या सुरक्षिततेला खूप गांभीर्याने घेते, म्हणून आम्ही याची चौकशी करू इच्छितो. कृपया तुमचे उबर अकाउंट आणि ट्रिप तपशील आम्हाला डीएम करा जेणेकरून आम्ही पुढील चौकशी करू शकू.”