दिवसभरात अनेक प्रकारची कामं केल्यानंतर अनेकांची बुद्धीही सुस्तावल्यासारखी होते. पण त्या सुस्तावलेल्या बुद्धीला चालना देण्यासाठी रोज ऑप्टिकल इल्यूजनचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. पैशांचा हिशोब ठेवण्यात पटाईत असणाऱ्यांना अशा फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्याचं एकप्रकारे आव्हानच असतं. असाच एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोत तीन मुली कंबरेवर हात देऊन मस्त पोज देताना दिसत आहेत. मात्र, या तीन मुलींचे प्रियकरही या फोटोत आहेत आणि तेच तुम्हाला शोधायचे आहेत. पण त्यांना शोधणं इतकं सोपं नाही, कारण त्यासाठी तुम्हाला तु्मच्या बुद्धीचा कस लावावा लागेल.

तुम्हाला फक्त २० सेकंदांची वेळ मिळेल

या फोटोत तीन मुली दिसत आहेत. या मुलींचे प्रियकर फोटोत कुठंतरी लपलेले आहेत. पण तुमच्याकडे गरुडासारखी नजर असेल, तरच तुम्हाला त्यांना शोधता येईल. यासाठी तुम्हाला २० सेकंदांचा वेळ दिला गेला आहे. तुम्हाला अजूनही या फोटोत लपलेले मुलींचे प्रियकर शोधता येत नसतील, तर तुम्हाला तीक्ष नजरेनं पुन्हा एकदा फोटोला पाहावं लागेल. तुमची वेळ संपल्यानंतरही तुम्हाला फोटोत ते प्रियकर दिसत नसतील, तर मग नक्कीच तुम्हाला याचं उत्तर सांगण्याची आवश्यकता आहे. तुम्ही बु्द्धीचा नीट वापर केला असता, तर तुम्हाला या फोटोत तीन प्रियकर दिसले असते. पण काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला या फोटोत तीन प्रियकर कुठे लपले आहेत, ते सांगणार आहोत.

या फोटोत तीन प्रियकर कुठे आहेत?

या फोटोत लपलेल्या तीन प्रियकरांना तुम्ही पाहू शकता.
optical illusion photo

२० सेकंदांची वेळ दिल्यानंतरही तुम्ही या फोटोत तीन प्रियकरांना शोधू शकला नसाल, तर काही समस्या नाहीय. तुम्हाला आम्ही या फोटोत तीन जण कुठे आहेत, ते दाखवणार आहोत. खरंतर पहिला प्रियकर या फोटोच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर लपला आहे. या फोटोत त्याचा चेहरा पाहू शकता. तर दुसरे दोघेही उजव्या बाजूला रस्त्याच्या कडेला लपलेले आहेत. दोघांचा चेहरा तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. अशाप्रकारे तुम्ही तिघांनाही पाहिलं आहे. पण त्यांना शोधणं अनेकांसाठी आव्हानच होतं. कारण या फोटोत लपलेल्या तिघांना शोधण्यासाठी तीक्ष्ण नजरेनं पाहण्याची गरज आहे.