UPSC Preparation With Full Time Job Tips: UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणे ही पूर्ण वेळ नोकरी करण्यासारखीच बाब आहे. तीन कठीण पायऱ्या ओलांडून ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनेक उमेदवारांनी अभ्यासासाठी दिवसाचे २४ तासही अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. कित्येक तास सलग अभ्यास करताना नियमित आयुष्यातील अनेक गोष्टी बाजूला साराव्या लागतात अशी या स्पर्धा परीक्षेची ओळख आहे. पण आज आपण अशा एका UPSC उमेदवाराची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी पूर्ण वेळ नोकरी करून मग या स्पर्धा परीक्षेची तयारी केली. भारतीय वन सेवेत कार्यरत अधिकारी हिमांशू त्यागी यांनी आपल्या यूपीएससीच्या प्रवासातील अडथळ्यांवर कशी मात केली याविषयी खुलासा केला आहे. ‘यूपीएससीची तयारी आणि पूर्ण वेळ नोकरीची गाथा’ (UPSC prep and full-time job saga) या पुस्तकात त्यागी यांनी दिलेल्या काही गोल्डन टिप्स आज आपण पाहणार आहोत.

हिमांशू त्यागी हे स्वतः भारतीय वन सेवा अधिकारी असून IIT पदवीधर आहेत. त्यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये पूर्णवेळ नोकरीसह UPSC ची तयारी कशी केली याबद्दल सांगितले आहे. त्यागी म्हणाले की, पहाटे ३. ३० ला उठून चार तास अभ्यास करून मग मी कामावर जायला निघायचो. कामाच्या ठिकाणीही मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेऊन मी अभ्यास करायचो. जेव्हा छोटे ब्रेक असायचे तेव्हा सुद्धा मी मोबाईल आणि कॉम्प्युटरवर डाउनलोड केलेला अभ्यासक्रम वाचत राहायचो.

ऑफिसला जाताना प्रवासाचा अर्धा तास सुद्धा UPSC च्या अभ्यासासाठी दिला होता. ऑफिसनंतर त्यागी पुन्हा रोज ३० मिनिटे अभ्यास करायचे. आणि त्याचा शनिवार व रविवार पूर्णपणे यूपीएससीच्या तयारीसाठी समर्पित होता. विकेंडला १० तास अभ्यास करणे हा नियमच होता.

पूर्ण वेळ नोकरी करताना कसा केला UPSC चा अभ्यास?

दरम्यान, त्यागी म्हणतात की जेव्हा तुमच्यासमोर कठीण उद्दिष्ट्य असेल तेव्हा तुम्ही वेळ वाया घालवूच शकत नाही. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर निदान १ ते २ वर्ष या वेळापत्रकाचे पालन करायला हवे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य एका पोस्टमध्ये त्यागी यांनी अभ्यासासह झोपेचे महत्त्व सुद्धा अधोरेखित केले आहेत. ते म्हणतात, “अभ्यास हा मानसिकदृष्ट्या थकवणारा व्यायाम आहे, तुमच्या मेंदूमध्ये काही गोष्टी स्थिर होण्यासाठी तुम्हाला चांगली झोप मदत करेल. अन्य कामांमध्ये वेळ वाया घालवणे बंद करा आणि झोपेशी तडजोड टाळा. UPSC ची तयारी करत असल्यास ६ ते ७ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.”