scorecardresearch

नवरी न मिळे नवऱ्याला! ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद

एका तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, तो काळा असल्यामुळे लग्नाला नकार दिला आहे

नवरी न मिळे नवऱ्याला! ‘तु काळा आहेस’ म्हणत लग्नाला काही तास उरले असताना तरुणीने नवऱ्याला केलं नापसंद
मी तुझ्याशी लग्न केले तर माझे मित्र माझी मस्करी करतील. (Photo : Indian Express)

एका तरुणीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला तो काळा असल्याने लग्न करण्यास नकार दिल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवरा आपल्याला पसंत नसल्याचं तरुणीने लग्नाला काही तास उरले असताना सांगितलं. त्यामुळे नवऱ्या मुलाला जब ध आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नववधूने लग्नाचे काही विधी पार पडल्यानंतर मुलगा काळा असल्याचं म्हणत लग्नाला नकार दिला.

तरुणीने नवऱ्या मुलाला एकांतात सांगितलं की, मी तुझ्याशी लग्न करणार नाही आणि आपल्या लग्नाला तुच नकार दे असं तिने मुलाला सांगितलं. शिवाय जर तु माझ्याशी लग्न केलस तर मी पळून जाईन, अशी धमकीदेखील तरुणीने नवऱ्या मुलाला दिली. मुलीच्या धमकीला घाबरत या तरुणाने लग्नास नकारही दिला, मात्र, मुलाने लग्नास नकार देताच मंडपामध्ये वाद सुरु झाला.

तरुणीने लग्नास नकार दिलेल्या मुलाचे नाव दुर्गा प्रसाद असून तो दिल्लीत राहतो. दुर्गा प्रसादने सांगितलं की, माझं लग्न ठरलेली मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, ‘तू सुंदर नाहीस, फार शिकलेला नाहीस शिवाय काळाही आहेस, त्यामुळे जर मी मी तुझ्याशी लग्न केले तर माझे मित्र माझी चेष्टा करतील. त्यामुळे मी हे लग्न करू शकत नाही.’ धक्कादायक बाब म्हणजे तू या लग्नाला नकार दे, नाहीतर मी पळून जाईन आणि त्यामुळे तुझी जास्तच बदनामी होईल अशी धमकी दिल्याचे दुर्गा प्रसादने सागिंतलं.

दरम्यान, मुलीच्या धमकीमुळे दुर्गा प्रसादने लग्नाला नकार दिला. मात्र, याचवेळी मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला शिवीगाळ करत त्याच्या नातेवाईकांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. शिवाय मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना फोन करून त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी मुलासह त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत त्यांचे सर्व सामानही हिसकावून घेतलं. या संपूर्ण घटनेनंतर मुलाकडील लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून मुलीसह तिच्या कुटुंबियांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:29 IST

संबंधित बातम्या